आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी मोफत शाळा

By Admin | Updated: January 1, 2017 01:34 IST2017-01-01T01:34:09+5:302017-01-01T01:34:09+5:30

चिखली तालुक्यातील कटोडा येथे पुनर्वसन प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न झाले.

Free school for children of suicidal farmers | आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी मोफत शाळा

आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी मोफत शाळा

चिखली, दि. ३१- तालुक्यातील काटोडा येथे ह्यसत्यमेव जयतेह्ण या सामाजिक प्रकल्पाद्वारे नितेश थिगळे यांनी स्वत: ची जमीन विकून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी वसतिगृह, मोफत शाळा व पुनर्वसन प्रकल्पाची उभारणी केली असून या प्रकल्पाचे उद्घाटन २९ डिसेंबर रोजी शांतीवनचे दीपक नागरगोजे यांच्या हस्ते पार पडले.
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांतर्गत वाचनालयाचे उद्घाटन शिवराज पाटील, व्यायामशाळेचे उद्घाटन माजी आमदार जनुभाऊ बोंद्रे, व्यायामशाळा साहित्याचे उद्घाटन तहसीलदार विजय लोखंडे तर नियोजित मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्‍वेता महाले, माहिती पुस्तिकेचे विमोचन महेश अर्बनचे अध्यक्ष गोपाल मोदाणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सैन्यदलात कर्तव्यावर असलेल्या जवानांच्या आई-वडिलांचा सत्कार अकोला येथील संजीवनी परिवाराचे अध्यक्ष गजानंद यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी उपस्थितांनी नितेश थिगळे यांच्या कार्याचे कौतुक करून या ईश्‍वरी कार्यात सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. प्रसंगी लोकजागर परिवारचे प्रवीण गीते, रणजितसिंह राजपूत, गजानन धांडे, प्रल्हाद भुसारी, अजय बिल्लारी, कांता शेळके, गणेश सातवे, गणेश सोळंकी, प्रशांत ढोरे, राहुल खंडारे, गोपाल तुपकर, मंगेश पळसकर, वंदना निकम, अरविंद शेळके, प्रा. प्रल्हाद भुसारी, प्रा. सचिन बोराडे, मनोज दांडगे, समाधान सुपेकर, सुधाकर बोरसे, ङ्म्रीकिसन धोंडगे, महेश निंबाळकर, शशिकला अहेर, एकनाथ घांडगे, तुकाराम शेळके, सुनील डव्हळे, डॉ. माणिकराव डोके, अनिल जाधव, सागर सिरसाट, रमेश थिगळे, प्रवीण लहाने, आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Free school for children of suicidal farmers