चारचाकीने दुचाकीस उडविले

By Admin | Updated: May 12, 2014 22:51 IST2014-05-12T22:49:08+5:302014-05-12T22:51:26+5:30

चिखलीहून देऊळगावराजाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या इंडिका कारने विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी

Four-wheeler flew to the two-wheeler | चारचाकीने दुचाकीस उडविले

चारचाकीने दुचाकीस उडविले

चिखली : चिखलीहून देऊळगावराजाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या इंडिका कारने विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेरा चौकी नजिक असलेल्या रामनगर फाट्यावर घडली. तालुक्यातील मलगी येथे मित्राच्या लग्नानिमित्त सुरत येथून आलेला दीपक विश्‍वंभर साबळे वय २0 वष्रे व मलगी येथील विशाल तेजराव जाधव वय २५ वष्रे हे दोघेजण दुचाकी क्रमांक जी.जे.५ के.ई.९९६५ ने देऊळगाव राजाकडून चिखलीकडे येत असताना चिखलीवरून दे.राजाकडे जाणार्‍या भरधाव वेगातील इंडिका क्रमांक एम.एच.२१ ए.जी.२८८८ या वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दीपक साबळे व विशाल जाधव हे दोघे जण गंभीर झाले असून, जखमींना तातडीने चिखली ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दीपक साबळे याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यास पुढील उपचारार्थ बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: Four-wheeler flew to the two-wheeler