शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

ट्रकवर आदळली पोलिसांची कार, अपघातात ४ ठार तर ३ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 13:29 IST

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ४ जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ५.३० वाजेदरम्यान घडली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ४ जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये इंदोरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनच्या पिएसआयसह ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नांदुरा ते मलकापूर रोडवरील काटी फाट्याजवळ ही घटना घडली. 

मलकापूर : झायलो, फोर्डकार व कंटेनर च्या विचित्र अपघातात ४ जण जागीच ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मौजे काटीफाट्यानजीक सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ठार झालेले चौघेही अकोला जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. जखमींना खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.यासंदर्भात अधिक माहीती अशी की,सिमरोल जि.इंदौर मध्य प्रदेशातील पो.स्टे.अंतर्गत अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी बोरगांव मंजू येथील रोहीत अविनाश रायबोले वय २३ या आरोपीस अटक करून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मंडलोई व पो.काँ.मुकेश कन्नोज हे झायलो कार क्र. एम.एच.३०/पी.३२२५ ने सिमऱलकडे निघाले होते. त्यांच्या समवेत आरोपीचे नातेवाईक देखील होते.त्यांच्या समोर फोर्ड कार क्र. एम.पी.०९/सि.झेड.३८८६  होती. सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ६ वरील काटीफाट्यानजीक झायलो कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर क्र. एम.एच.४०/ए.के.४६०० वर धडकून पुन्हा मागील फोर्ट कारवर आदळली. सुदैवाने फोर्डचा बलून ऐनवेळी कार्यान्वित झाला. व त्यात बसलेले शैलेश खतोसिया, प्रतिक रावत, राहुल पाटणकर, सुदाम तव्वर असे नांदेड गुरूद्वारा दर्शन करुन परतीच्या वाटेवर असलेले चार जण बालबाल बचावले.मात्र झायलो सुसाट वेगात दोन वाहनावर आदळल्याने त्यातील चार जण जागीच ठार झाले. त्यापैकी मनोज रामेश्वर खरबील,अविनाश ओंकार रायबोले रा.बोरगांव मंजू ,सुनील परदेशी,अंबादास लोथे रा.कापशी जि.अकोला अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत सिमरोल इंदौर पो.स्टे.चे सपोनि दिपक मंडलोई, पो.काँ.मुकेश कन्नोज व अटक आरोपी रोहित रायबोले असे तिघे गंभीर जखमी आहेत. मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ व मनसेचे पदाधिकारी गजानन ठोसर यांनी जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना गंभीर जखमा असल्याने खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :AccidentअपघातbuldhanaबुलडाणाDeathमृत्यूPoliceपोलिस