धाडमध्ये वरली मटक्यावर छापा

By Admin | Updated: June 25, 2014 00:02 IST2014-06-24T23:51:04+5:302014-06-25T00:02:37+5:30

पोलिसांची कारवाई : चार जणांना अटक

In the forage raid on the upper ridge | धाडमध्ये वरली मटक्यावर छापा

धाडमध्ये वरली मटक्यावर छापा

धाड : गावाच्या ऐन मध्यवर्ती भागात चालणार्‍या वरली मटका व्यवसायावर स्थानिक पोलिसांनी अचानक छापा मारुन चार जणांना अटक केली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून धाडमध्ये छुप्या पध्दतीत अवैध वरली मटक्याचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती आहे. २३ जून रोजी पोलिसांनी गावातील मेनरोडवर सराफा गल्लीत असणार्‍या राजेंद्र त्र्यंबक सोनटक्के यांचे टेलरिंग व्यवसायाचे दुकानात छापा मारुन त्या ठिकाणी चालणारा वरली मटका पकडला यामध्ये राजेंद्र त्र्यंबक सोनटक्के वय ५२ धाड, अंबादास कोंडूबा वाघ वय ४७ रा.बोरखेड, भाऊराव देवराव किलबिले वय ६५ रा.रुईखेड, डिगांबर हरीभाऊ शिंदे वय ६३ रा.रुईखेड या आरोपीजवळील वरली मटक्याच्या चिठया व साहित्य तसेच १0७0 रु. नगदी रोख असा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना अटक केली आहे.

Web Title: In the forage raid on the upper ridge