अन्नसुरक्षा योजनेचे धान्य खुल्या बाजारात

By Admin | Updated: May 22, 2014 23:40 IST2014-05-22T22:50:17+5:302014-05-22T23:40:41+5:30

गोरगरीब लाभार्थ्यांना धान्य मिळत नसून, दुकानदारांची मात्र चांदी होत आहे.

Food grains in the open market | अन्नसुरक्षा योजनेचे धान्य खुल्या बाजारात

अन्नसुरक्षा योजनेचे धान्य खुल्या बाजारात

मेहकर: मावळत्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने गोरगरिंबांसाठी सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेतील धान्याची, स्वस्त धान्य दुकानदार सर्रास वाढीव दराने खुल्या बाजारात विक्री करीत आहेत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामूळे, गोरगरीब लाभार्थ्यांना धान्य मिळत नसून, दुकानदारांची मात्र चांदी होत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना गहू २ रुपये किलो, तांदूळ ३ रुपये किलो व भरड धान्य१ रुपये किलो दराने देण्याचा शासन निर्णय आहे; परंतु स्वस्त धान्य दुकानदार सर्रास वाढीव दराने खुल्या बाजारात धान्याची विक्री करीत आहेत. पात्र लाभार्थ्यांना ते अन्न सुरक्षा योजनेसाठी पात्र नसल्याचे सांगून, धान्य देण्यास टाळाटाळ केली जाते आणि लाभार्थ्यांच्या नावे आलेल्या धान्याची खासगी दुकानदारांना चढय़ा भावाने विक्री केली जात आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Food grains in the open market