शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला पाच हजार सिटी स्कॅन, शासकीय दर नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 11:46 IST

Five thousand CT scans per month: शासकीय दराऐवजी मनमानी पध्दतीने सीट स्कॅनसाठी दराची आकारणी केली जात असल्याचे वास्तव समोर येत आहेे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरासह जिल्ह्यात  महिन्याकाठी चार ते पाच हजारावर सीटी स्कॅन केले जात आहेत. मात्र,  शासकीय दराऐवजी मनमानी पध्दतीने सीट स्कॅनसाठी दराची आकारणी केली जात असल्याचे वास्तव समोर येत आहेे. राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी खासगी केंद्रामध्ये सीटी स्कॅनचा दर निश्चित केला आहे. २ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त दर आकारू नये, असे निर्देशही दिले आहेत. असे असताना, काही खासगी केंद्र ३५०० ते ४५०० रुपये शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. खासगी केंद्रातील कोरोना रूग्णांना सीटी स्कॅन आणि इतर तपासण्यांसाठी दामदुपटीने दर मोजावे लागत आहे. बुलडाणा शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला असून, खासगी रूग्णालयाशी संलग्न असलेले औषध दुकानदार रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे उकळत आहेत. मात्र, याकडे शासकीय यंत्रणेचे अक्षरक्षा दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहेे.

दुपटीने वाढले सीटी स्कॅन एचआरसीटीकोरोना विषाणु संसर्गाचा उद्रेक वाढत असतानाच कोरोनाबाधित रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अतिरीक्त शुल्क मोजावे लागत आहे. सीटीस्कॅन तसेच विविध तपासण्यांसाठी दूपटीने शुल्क आकारल्या जात आहे. त्यामुळे कोरोना बाधित रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक गत काही दिवसांपासून मेटाकुटीस आले आहेत.

कोरोना कालावधीत सेवा देण्यासाठी शहरातील खासगी डाॅक्टर प्रयत्नरत आहेत. रूग्णांना सुविधा देण्यासाठी खासगी डाॅक्टरांची धडपड सुरू आहे. सेवेलाच खासगी डाॅक्टर आणि रक्तपेढी तसेच सीटी स्कॅनचीही सेवा दिली जात आहे. दरम्यान, शासकीय दरानुसारच सर्व शुल्क आकारले जातात. मात्र, काही रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अतिरिक्त दर आकारल्या जात असल्याचे आरोप बिनबुडाचे आहेत.-डॉ. के.एम. टिकार, 

 कोरोना संसर्गाचा दुर्दवी सामना परिवारातील दोन सदस्यांना करावा लागत आहे. गत दहा दिवसांपासून दोन्ही रूग्ण एका खासगी रूग्णालयात भरती आहे.  या रूग्णालयातून उपचारासाठी लागणारे इंजेक्शन आणि इतर सुविधांसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. नाइलाजाने रूग्ण वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.    - कैलास पवार, नातेवाईक, धाड.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस