बुलडाण्यातील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 09:43 IST2019-04-15T09:33:08+5:302019-04-15T09:43:43+5:30

बुलडाण्याच्या मेहकर-डोनगाव  रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (15 एप्रिल) ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला.

five dead and five injured in a road accident in Maharashtra's Buldhana | बुलडाण्यातील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

बुलडाण्यातील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

ठळक मुद्देबुलडाण्याच्या मेहकर-डोनगाव  रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला.अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

बुलडाणा - बुलडाण्याच्या मेहकर-डोनगाव  रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (15 एप्रिल) ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे सोमवारी दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृतक व  जखमी हे अंजनी बुद्रुक येथीलच रहिवासी आहेत. मध्य प्रदेशातील महू येथून हे सर्वजण परतत असताना अपघात झाला आहे. 



 

Web Title: five dead and five injured in a road accident in Maharashtra's Buldhana