गोठ्याला लागलेल्या आगीत पाच जनावरे दगावली

By अनिल गवई | Published: September 27, 2023 05:21 PM2023-09-27T17:21:39+5:302023-09-27T17:23:07+5:30

आग लागताच काही जनावरे दोर तोडून गोठ्यातून बाहेर पडली. मात्र २ गायी व ३ बैलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

Five animals were killed in the fire | गोठ्याला लागलेल्या आगीत पाच जनावरे दगावली

गोठ्याला लागलेल्या आगीत पाच जनावरे दगावली

googlenewsNext

खामगाव: तालुक्यातील हिवरा बु. येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून पाच जनावरे दगावली. तर पाच जनावरे गंभीर जखमी झाली. बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता दरम्यान ही घटना घडली.

याबाबत सविस्तर असे की, खामगाव तालुक्यातील हिवरा बु. गाव शिवारालगत असलेल्या ज्ञानेश्वर पुंडलिक हागे (३५) यांच्या गुरांच्या गोठ्याला सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागताच काही जनावरे दोर तोडून गोठ्यातून बाहेर पडली. मात्र २ गायी व ३ बैलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर ३ म्हशी, १ गाय व १ बैल होरपळून गंभीर जखमी झाले आहेत. त्याचवेळी गोठ्यामधील गजानन हागे यांनी ठेवलेले ८ ते १० ट्रॉली कुटार जळून खाक झाले आहे. या आगीमध्ये सुमारे ५ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: Five animals were killed in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.