उष्माघाताचा पहिला रुग्ण सामान्य रुग्णालयात दाखल

By Admin | Updated: April 21, 2017 23:46 IST2017-04-21T23:46:41+5:302017-04-21T23:46:41+5:30

प्रकृतीत सुधारणेनंतर रुग्ण पळाला!

The first patient of hemoglobin admitted to a general hospital | उष्माघाताचा पहिला रुग्ण सामान्य रुग्णालयात दाखल

उष्माघाताचा पहिला रुग्ण सामान्य रुग्णालयात दाखल

खामगाव : शहरातील तापमानाने उच्चांक गाठला असून यावर्षीचा उष्माघाताचा पहिला रुग्ण गुरुवार २0 एप्रिल रोजी येथील सामान्य रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तो कोणाला न सांगताच निघून गेला.
खामगाव शहरातील रहिवाशी शे.मुशीर शे.बिस्मिल्ला (वय २७ वर्ष) याला उष्माघाताचा त्रास होवू लागल्याने सामान्य रुग्णालयातील उष्माघात कक्षात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु झाल्यानंतर प्रकृतीत सुधारणाही झाली होती. मात्र सदर रुग्णाबाबत माहिती घेण्यासाठी प्रस्तूत प्रतिनिधीने उष्माघात कक्षाला भेट दिली असता तो रुग्ण गायब झाल्याचे दिसून आले. शोधाशोध करुनही तो न सापडल्याने रुग्णालयाच्यावतीने याबाबत पोलिस स्टेशनला माहिती देण्यात येणार आहे, असे रुग्णालयीन सुत्रांकडून सांगण्यात आले. खामगावातील पारा गत पंधरा दिवसांपासून अधिकच वाढला असून, तापमान ४४ डिग्री सेल्सीअसवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, उन्हामुळे होणार्‍या आजारांमध्येही वाढ होत आहे.

Web Title: The first patient of hemoglobin admitted to a general hospital