शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विष्णुवाडीत शॉर्ट सर्किटमुळे आग; १७ लाखांचे साहित्य खाक

By admin | Updated: April 20, 2017 23:28 IST

बुलडाणा : शहरातीलच विष्णुवाडी येथील बाळकृष्ण नारखेडे यांच्या घराला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून १७ लाखांचे नुकसान झाले आहे.

बुलडाणा : शहरातीलच विष्णुवाडी येथील बाळकृष्ण नारखेडे यांच्या घराला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून १७ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेत जीवित हानी झाली नाही. रात्री किचनमध्ये आगीचे लोळ उठत असल्याने वरच्या मजल्यावर गाढ झोपेत असलेल्या कुटुंबीयांची एकच तारांबळ उडाली. बाळू नारखेडे यांनी आरडाओरड केल्याने शेजारी झोपेतून उठले व काहींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तर अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहचल्याने आग आटोक्यात आली. यात जीवित हानी झाली नसली, तरी नारखेडे यांच्या घरातील जवळपास महत्त्वाचे सर्व सामान जळून खाक झाले आहे. विष्णुवाडी स्थित बाळकृष्ण नारखेडे यांचे घर आहे. रात्रीचे जेवण आटोपून नारखेडे कुटुंबीय वरच्या मजल्यावर झोपी गेले. मध्यरात्री २ वाजून ४५ मिनिटांनी नारखेडे यांच्या पत्नी मनीषा यांना अचानक जाग आली. तसेच घरामध्ये धूर जमा झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी उठून पाहिले असता किचनमध्ये आगीचे लोळ उटत होते. याची माहिती त्यांनी मोबाइलवरून पती बाळकृष्ण नारखेडे यांना दिली. तसेच आरडाओरड करुन शेजाऱ्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. वरच्या मजल्यावर झोपलेले बाळू नारखेडे यांनी मागच्या दरवाज्याने प्रवेश केला व सर्व कुटुंबीयांना बाहेर काढले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन तसेच अग्निशमक दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस व अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत शेजाऱ्यांनी बोअर व नळ चालू करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत घरातील टिव्ही, फ्रिज, पंखे, एसी, डीव्हीडी प्लेयर, फर्निचर आगीच्या भक्षस्थानी पडले होते. या घटनेची माहिती शहरभर पसरल्याने शिवसेना नेते संजय गायकवाड, बद्रीसेठ पंजाबी, डॉ. काळे, शिक्षक इंगळे, पिंपरकर, लढ्ढा, जाधव यांनी मदतीसाठी प्रयत्न केले. आग लागल्याने सहा बकऱ्या ठारहिवरा आश्रम : येथून जवळच असलेल्या कळंबेश्वर येथे गोठ्यांना अचानक आग लागली. या आगीमध्ये सहा बकऱ्या ठार, तर अन्नधान्याचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. कळंबेश्वर येथील शेख नजीर शेख करीम व श्रीराम जुमडे यांचे गोठे गावाला लागूनच आहे. दुपारी अचानक आग लागल्याने शेख नजीर शेख करीम यांच्या बकऱ्या ठार झाल्या, तर जुमडे यांचे तूर, गहू, ज्वारी व इतर साहित्याचे नुकसान झाले. घटनेची माहिती कळताच आ.डॉ. संजय रायमुलकर, जि.प. सदस्य आशिष रहाटे, तहसीलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी, घटनास्थळी उपस्थित होते.