शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आगीचे तांडव!

By admin | Updated: April 20, 2017 23:26 IST

तांदूळवाडीत सात घरे खाक : तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचविले जनावरांचे प्राण

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील तांदूळवाडी येथे गुरुवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सात घरे व अनेकांचे गोठे जळून खाक झाले. यामध्ये किमान २० ते २५ लाखांचे नुकसान झाले. जि.प. प्राथमिक शाळेसमोरील एका गोठ्याला दुपारी आग लागली. आगीची वार्ता गावात पसरताच काही धाडसी युवकांनी गोठ्यातील बैलांना सोडवून त्यांचे प्राण वाचविले. त्याचवेळी वारा सुटल्याने आगीने सात घरे व गोठे यांना कवेत घेतले. सरपंच बुंधे आणि शिवसेना विभागप्रमुख अनंता शेळके यांनी तातडीने पोलीस स्टेशन, चिखली नगरपालिकेचे अग्निशमन दल, मेहकरचे अग्निशमन दल यांच्याशी संपर्क साधला. गावातील युवकांनी बैलगाडीवर ड्रम टाकून मिळेल तेथून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु वाऱ्यामुळे आग फैलतच चालली होती. मनोहर एकनाथ बुंधे यांनी तातडीने स्प्रिंक्लरचे पाइप जोडून पाणी त्याठिकाणी पोहचविले. अवघ्या दोन तासांत गुलाब सुखदेव बुंधे, ईश्वर बुंधे, भागवत बुंधे, घनश्याम अंभोरे, सुधाकर अंभोरे, रमेश बुंधे, बबन बुंधे यांची घरे आणि गोठे जळाली. भागवत यांची थ्रेशर मशीनही जळाली. आगीचे तांडव एवढे भयानक होते, की पाणी टाकणाऱ्या यवुकांचे हात भाजले. पाणी वाहून आणणाऱ्या बैल गाडीने सुद्धा पेट घेतला होता. वेळीच लक्षात आल्याने बैलगाडी वाचली. सरपंच भुजंगराव बुंधे, माजी सरपंच मनोहर बुंधे, अरुण बुंधे, किरण बुंधे यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. यावेळी तहसीलदार संतोष कणसे, जि.प.चे सभापती दिनकरराव देशमुख, जि.प. सदस्य राम जाधव, शिवसेना नेते रवींद्र पाटील, पं.स. सदस्य बद्री बोडखे, सरपंच महेंद्र पाटील, बबन लोढे घटनास्थळी पोहचले. पटवारी, पोलीस स्टेशनचे कर्मचारी, ग्रामसेवक यांनी पंचनामा करणे सुरू केले. आगीचे तांडव पाहून एका महिलेला भोवळ आली. तातडीने तिला रुग्णालयात हलविण्यात आले.