शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

अंबिका अर्बन पतसंस्थेत आग; कागदपत्रांसह साहित्य खाक

By admin | Updated: April 14, 2017 23:12 IST

बुलडाणा- जिजामाता प्रेक्षागारमधील अंबिका अर्बन को-आॅपरेटिव्ह पतसंस्थेच्या कार्यालयाला शुक्रवारी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

चोरट्यांनी सीसी कॅमेऱ्यांची तार कापण्याच्या प्रयत्नात आग

बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारमधील अंबिका अर्बन को-आॅपरेटिव्ह पतसंस्थेच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. कार्यालयात चोरट्यांनी चोरी करण्याकरिता सीसी कॅमेऱ्याची तार कापण्याचा प्रयत्न करीत असताना ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. येथील जिजामाता प्रेक्षागारमध्ये अंबिका अर्बन को-आॅपरेटिव्ह पतसंस्थेचे कार्यालय आहे. या कार्यालयात शुक्रवारी रात्री काही चोरटे शिरले. चोरी करण्याकरिता त्यांनी आधी सीसी कॅमेऱ्यांची तार कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. या आगीत कार्यालयातील दोन एसी, संगणक, खुर्च्या व महत्त्वाचे कागदपत्रे जळाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या आर.ओ. यंत्र विक्रीच्या दुकानात चोरी झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. सदर चोरट्यांनीच अंबिका अर्बनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना सदर आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.