पित्याचा खून करणार्‍यास पाच वर्षे तुरुंगवास

By Admin | Updated: April 21, 2017 23:53 IST2017-04-21T23:53:23+5:302017-04-21T23:53:23+5:30

पित्याची हत्या करणार्‍या आरोपीस न्यायालयाने शुक्रवारी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली.

Father's murderer imprisoned for five years | पित्याचा खून करणार्‍यास पाच वर्षे तुरुंगवास

पित्याचा खून करणार्‍यास पाच वर्षे तुरुंगवास

डोणगाव (बुलडाणा): बेलगाव येथे २७ जानेवारी २0१४ ला पित्याची हत्या करणार्‍या आरोपीस न्यायालयाने शुक्रवारी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. आरोपी परमेश्‍वर संपत डोंगरे (२७) याने संपतराव नागाजी डोंगरे (६५) यांचा कौटूंबिक वादाचे कारणातून लोखंडी हत्याराने वडील संपतराव डोंगरे यांच्या डोक्यावर मारुन जीवाने ठार मारले. दरम्यान २१ एप्रिल २0१७ रोजी सदर गुन्ह्याचा निकाल मेहकर येथील सेशन कोर्ट येथे लागला असून, आरोपीस न्यायाधिश यांनी ५ वर्षे तुरुंगवास व २00 रुपये दंड ही शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्ह्यात सरकारी वकील अँड.तायडे व अँड.पैरवी यांनी काम पाहिले.

Web Title: Father's murderer imprisoned for five years