तहसीलदारांच्या दालनात शेतकºयांचा ठिय्या

By Admin | Updated: April 21, 2017 13:35 IST2017-04-21T13:35:06+5:302017-04-21T13:35:06+5:30

मागण्यांसाठी शेतकºयांनी तहसीलदार यांच्या दालनात शुक्रवारी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

The farmers of the tahsildar's house strained | तहसीलदारांच्या दालनात शेतकºयांचा ठिय्या

तहसीलदारांच्या दालनात शेतकºयांचा ठिय्या

नांदुरा: शासकीय तूर खरेदी सुरू रहावी, तूर खरेदीतील गैर व्यवहार बंद व्हावेत, बारदाना कायम उपलब्ध करावा यासह आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्या दालनात शुक्रवारी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या दिला. यावेळी शेतकरी हिताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचा निषेधही नोंदविण्यात आला.

Web Title: The farmers of the tahsildar's house strained