विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

By Admin | Updated: May 25, 2014 00:06 IST2014-05-24T23:04:30+5:302014-05-25T00:06:05+5:30

जवळा बु.येथे शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

Farmer's Suicide by Poisoning Prison | विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

जवळा बु. : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी येथे घडली. जवळा-पळसखेड येथील भिकाजी रामचंद्र मेतकर (वय ५0) यांच्याजवळ २ एकर शेती आहे. त्या शेतीवर ग्रामीण बँकेचे २५ हजाराचे कर्ज काढले होते. मागीलवर्षी कमी पावसाने तर यावर्षी अतीवृष्टीमुळे गारपीट झाल्याने पूर्ण पीक नष्ट झाले. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी रात्री एकच्या दरम्यान कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

Web Title: Farmer's Suicide by Poisoning Prison