शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या केंद्रावर तुर खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 13:39 IST

तालुक्यातील शेकडो शेतकºयांची केंद्रावर एकच गर्दी झाल्यानेकाहीवेळ चांगलाच गोंधळ उडाला.

मेहकर : नाफेडच्या वतीने तुर खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे शनिवार१५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी आपला माल नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणलाहोता. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची केंद्रावर एकच गर्दी झाल्यानेकाहीवेळ चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान आ. संजय रायमुलकर, सभापती माधवरावजाधव आणि तहसिलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी जावून शेतकऱ्यांची समजूतकाढत मालाची नोंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना केले. शेतकऱ्यांचा सर्व मालनाफेडने खरेदी करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचाईशारा आ. रायमुलकर यांनी दिला. नाफेड मार्फत तुर खरेदी सुरू झाल्यानंतर बारदान्याचा तुटवडा निर्माणझाल्याने मध्यंतरी तुर खरेदी बंद झाली होती. त्यावेळी शिवसेना व बाजारसमितीने संबंधीतांशी चर्चा करून बारदाना उपलब्ध करून दिला होता. ही अडचनसुटत नाही तोच, मेहकरचे धान्य गोदाम फुल्ल झाले होते. तेव्हा नांदुरायेथील गोदामात माल साठविण्याचे ठरले होते. शेतकऱ्यांचा माल दररोज बाजारातयेत असल्याने गोंधळ उडू नये म्हणून बाजार समितीने नाव नोंदणीची व्यवस्थासुरू केली होती. या दरम्यान नाफेडने १५ एप्रिल सायंकाळी ५ वाजे पर्यंततुर खरेदी करण्यात येईल असा आदेश जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनीकाढल्याने १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी  एकच गर्दी करून जवळपास ५००ट्रॅक्टर माल नाफेड खरेदी केंद्रावर आणला होता. आपल नंबर आजच लागावायासाठी शेतकऱ्यांनी गोंधळ केला. त्यामुळे आ. संजय रायमुलकर, सभापतीमाधवराव जाधव, दत्ता पाटील शेळके, उप सभापती बबनराव तुपे, खविसचे विनोदबापू देशमुख, रविकुमार चुकेवार, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप देशमुख,भास्करराव घोडे, गजानन तात्या कृपाळ, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर आदिनीतहसिलदार संतोष काकडे यांना बोलावून घेतले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजुनघेण्यात आल्या. त्यानुसार ५ वाजे पर्यंत बाजार समिती यार्डात तुर घेवूनयेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांची नाव नोंदणी करण्यात येवून तुर खरेदी करण्यातयेईल असे आश्वासन देण्यात आले. काही शेतकऱ्यांनी पांढरी तुर खरेदी केल्याजात नाही. अशी तक्रार करताच सदर तुर खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले.शेतकऱ्यांची तुर खरेतदी करणे हे नाफेडचे काम असून मेहकर तालुक्यातीलप्रत्येक शेतकऱ्यांची तुर नाफेड खरेदी करेल. त्यात अडथळा आल्यासशिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा आ. संजय रायमुलकर यांनीउपस्थित हजारो शेतकऱ्यांसमोर दिला. तसेच शासनाने तुर खरेदीसाठी बारदाना,धान्य गोदाम उपलब्ध करून द्यावे व तुर खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावीअशीही मागणी आ. रायमुलकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)