विद्युत धक्क्याने शेतकरी जखमी

By Admin | Updated: January 20, 2015 00:51 IST2015-01-20T00:51:33+5:302015-01-20T00:51:33+5:30

मेहकर तालुक्यातील घटना; शेतातील विद्युत रोहित्रावर विद्युत धक्का लागून शेतकरी गंभीर जखमी.

Farmers injured by electric shock | विद्युत धक्क्याने शेतकरी जखमी

विद्युत धक्क्याने शेतकरी जखमी

मेहकर (बुलडाणा): शेतातील विद्युत रोहित्रावर विद्युत धक्का लागून शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना १९ जानेवारी रोजी मेहकर शिवारात घडली. येथील विजय तेजराव म्हस्के हा शेतात गव्हाला पाणी देत असताना अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे विजय म्हस्के हा विद्युत रोहित्रावर गेला असता त्याला विद्युतचा जबर धक्का बसला. त्यामध्ये शेतकरी विजय म्हस्के हा गंभीर जखमी झाला आहे. या विद्युत रोहित्राकडे वीज अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकर्‍यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरी याकडे लक्ष देण्याची मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी केली आहे.

Web Title: Farmers injured by electric shock