शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे मदतीसाठी अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:43 IST

अर्ज भरण्यापासून फोटो अपलोड करण्याचे कामही शेतकºयांना देण्यात आल्याने शेतकरी गोंधळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता मदतीसाठी अडथळ्यांची शर्यत सुरू झाली आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाच सर्वेच्या कामाला जुंपण्यात आलेले आहे. अर्ज भरण्यापासून फोटो अपलोड करण्याचे कामही शेतकºयांना देण्यात आल्याने शेतकरी गोंधळले आहेत. नुकसानाचे अर्ज भरण्याची ही प्रक्रिया रविवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे. परंतू सध्या पावसाने सोयाबीनला कोंब आले आहेत. सुडी लागलेल्या सोयाबीनला बुरशी आलेली दिसून येत आहे. ज्वारी, मका पिकावरही मोड आल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. कपाशीचे बोंडही पावसाने खराब झालेले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी सर्वाधिक आहेत. सोयाबीनचा हंगाम अंतीम टप्प्यात असताना पावसाचा तडाखा या पिकाला बसला. त्यामुळे पीक घरात येण्यापूर्वीच हातचे गेले. या नुकसानामुळे शेतकरी चिंताग्रस्त असताना आता मदतीसाठी शेतकºयांना लढा द्यावा लागत आहे. खरीप हंगामापासून पीके जगविण्यासाठी कष्ट करणारा शेतकरी आता नुकसान झाल्याने मदतीसाठी धडपड करीत आहे. सध्या परतीच्या पावसाने झालेलया नुकसानाचे पंचमाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतू कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यात शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांना नुकसान झालेल्या पिकाबाबत अर्ज भरण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. परंतू या मुदतीमध्ये शेतकºयांना सुट देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तालुका कृषी कार्यालयांमध्ये शेतकºयांची गर्दी होत आहे. या अर्जाबरोबर नुकसान झालेल्या पिकाचा फोटो मागविण्यात आलेला आहे. परंतू बहुतांश शेतकºयांना फोटो काढण्यासारखे मोबाईल उपलब्ध नाहीत. कागदपत्र वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसाने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनाम सध्या सुरू आहेत. पीक विमा काढलेल्या शेतकºयांना सुरूवातीला ३१ आॅक्टोबरपर्यंत अर्ज मागविले होते. परंतू सध्याही अर्ज स्विकारण्यात येत आहेत. रविवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.- नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी