शेतकर्‍यांचे उपोषण

By Admin | Updated: June 18, 2014 00:39 IST2014-06-17T21:41:20+5:302014-06-18T00:39:53+5:30

अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे.

Farmers Fury | शेतकर्‍यांचे उपोषण

शेतकर्‍यांचे उपोषण

संग्रामपूर: तालुक्यातील करमोडा येथील गारपिटग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचा सर्वेकरून त्यांना तात्काळ मोबदला अदा करण्यात यावा, तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांवर कारवाई करावी, यामागणीसाठी अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे.
गारपिटीचे सर्व्हेक्षण करण्यात कामचुकार पणा करणारे तलाठी शे. वसीम आणि मंडळ अधिकारी बघिले यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी या शेतकर्‍यांची आहे. याबाबतह वारंवार निवेदन देवूनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे श्रीकृष्ण उगले, रामेश्‍वर वर्गे, डिंगाबर जळमकर, भाऊराव भगत, दिनकर उगले, विनायक खडीशंकर, वासुदेव वर्गे, विकास वर्गे, अमोल घुमरे, सदाशिव इंगळे, श्रीकृष्ण गोतमारे, पंजाबराव कोरडे, सुरेश भातुरकर, वामन पवार, ज्ञानेश्‍वर सोळंके, प्रविण तायडे आदी शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

Web Title: Farmers Fury