शेतक-यांच्याच खात्यात रक्कम जमा करणार

By Admin | Updated: May 2, 2017 19:07 IST2017-05-02T19:07:02+5:302017-05-02T19:07:02+5:30

मेहकर- येथील तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे तहसिलदार संतोष काकडे यांनी सांगितले.

Farmers' funds will be deposited in the account | शेतक-यांच्याच खात्यात रक्कम जमा करणार

शेतक-यांच्याच खात्यात रक्कम जमा करणार

दोन दिवसात तूर खरेदी केंद्र सुरु होईल - तहसिलदार काकडे

मेहकर : नाफेड मार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने तसेच तुरीचा बारदाना नसल्याने मेहकर येथील तूर खरेदी केंद्र काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकरी परेशान झाले आहेत. दरम्यान येत्या दोन दिवसात मेहकर येथील तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे तहसिलदार संतोष काकडे यांनी सांगितले.
१ मे रोजी नाफेड अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ व महसूल अधिकारी यांची तहसिल कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी तहसिलदार संतोष काकडे संबंधित अधिकाऱ्यांना सुचना करीत होते. शेतकऱ्यांची खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने तसेच बारदाना नसल्याने गेल्या काही दिवसापासून तूर खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे शेतकरी परेशान झाले आहेत. जवळपास १९ हजार क्विंटल तूरीचे मोजमाप करणे अजूनही बाकी आहे. तर खरेदी केलेली तूर ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात उघड्यावर ठेवण्यात आली आहे. तूर खरेदी केंद्र लवकर सुरु व्हावे, यासाठी सर्व स्तरातून मागणी होत आहे. मेहकर येथील खरेदी केलेली तूर आज व उद्या उचलून खामगाव येथे साठविण्यात यावी, तसेच उर्वरीत तूर खरेदी करुन त्याचे तात्काळ मोजमाप करावे, अशा सुचना तहसिलदार काकडे यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Farmers' funds will be deposited in the account