शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

जलपुर्ती सिंचन समितीकडून शेतक-यांची फसवणूक

By admin | Updated: April 15, 2017 13:26 IST

आवश्यक जमिनीचा सातबारा जोडूनही जलपुर्ती सिंचन विहीरसमितीने क्षेत्र कमी असल्याचे कारण दाखवून अपात्र केले.

सिंदखेडराजा : तालूक्यात विदर्भातील ११ जिल्ह्यात जिल्हानिहाय आलेल्याजलपुर्ती धडक सिंचन विहीरीसाठी १४ आॅगस्ट २००७  रोजी केलेल्या विहीरीच्या अर्जासाठी  आवश्यक जमिनीचा सातबारा जोडूनही जलपुर्ती सिंचन विहीरसमितीने क्षेत्र कमी असल्याचे कारण दाखवून अपात्र केले. मात्र याबाबत सदरशेतकरी २०१० पासुन विहीर मिळावी, यासाठी प्रयत्न करीत असताना सुद्धाअधीकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही.तालुक्यातील चिंचोली जहाँगिर  येथील विठोबा बापु पवार या अल्पभुधारकशेतकऱ्याने जलपुर्ती सिंचन विहीर मिळावी, यासाठी १४ आॅगस्ट २००७ रोजीतहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यावेळी अर्जासोबत १ हे ३४ आर. चासातबारा  व त्यामधे १२५ गट नं. मध्ये ६७ आर. चा सातबारा जोडला. त्यानंतर२०१० साली तालुक्यातील विहीरी मंजुर झालेल्याची यादी पंचायत समितीमध्येप्रसीद्ध झाली. सदर यादीमध्ये सदर शेतकऱ्यांच्या १२५ गट मध्ये  ६७ आर.जमिन असताना ३३ आर. क्षेत्र दाखवून अपात्र केल्याचे कळाले. यामुळे  सदरशेतकऱ्याने आवश्यक जमिन असताना जाणीवपूर्वक अपात्र केल्याने  ४ मे २०१०रोजी समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सिंदखेड राजा यांना अर्ज देवूनजमिनीचे सातबारा सुद्धा जोडला व त्याच्या प्रती तत्कालीन आ.डॉ.राजेद्रशिंगणे, जिल्हाधीकारी बुलडाणा, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,गटविकास अधीकारी यांच्याकडे पात्र असताना अपात्र केलेल्या प्रकरणी न्यायदेण्याची मागणी केली. तद्नंतर दुसरा अर्ज ७ जून २०१० रोजी खा.प्रतापरावजाधव यांच्यासह संबंधित अधिकारी यांना दिला. तिसरा अर्ज ३० नोव्हेंबर२०१५ रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला. तरीसुद्धा जलपुर्ती सिंचनविहीर समितीने दखल घेतली नाही. फक्त गटसमन्वयक तथा तहसिलदार यांनीगटविकास अधिकारी यांना २ डिसेंबर  २०१५   ला पत्र पाठवून योग्य ती चौकशीकरून अर्जदारास परस्पर कळविण्यात यावे, असे म्हटले होते. तरी सुद्धाकाहीच कार्यवाही करण्यात आली नाही. तरी न्याय मिळेल म्हणून शेवटच्याटप्प्यावर येवुन  १३ एप्रिल २०१७ रोजी परत पात्र असताना अपात्र करूनअन्याय केल्यामुळे सदर शेतकऱ्याने आपणास विहीर देऊन न्याय देण्याची मागणीतहसिलदार सिंदखेड  राजा यांच्याकडे केली आहे.(तालुका प्रतिनिधी)