जिल्हाधिकार्‍यांना बडतर्फ करा

By Admin | Updated: May 30, 2014 00:37 IST2014-05-29T23:37:51+5:302014-05-30T00:37:34+5:30

बुलडाणा जिल्हा साखर कामगार समन्वय समितीची मागणी

Extend the District Collector | जिल्हाधिकार्‍यांना बडतर्फ करा

जिल्हाधिकार्‍यांना बडतर्फ करा

बुलडाणा : जिजामाता सहकारी साखर कारखाण्याच्या कामगारांचे थकीत वेतन ता तडीने अदा करावे, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना देऊनही याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यास बडतर्फ करण्याची मागणी बुलडाणा जिल्हा साखर कामगार समन्वय समितीने केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात समितीने म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षां पासून जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे वेतन थकले आहे. थकीत वेतन मिळावे म्हणून कामगारांनी अनेक आंदोलने केलीत; मात्र त्यांना न्याय न मिळाल्याने अखेर कामगारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व अवसायक यांना स्पष्ट निर्देश देत कामगारांचे थकीत वेतन तातडीने द्यावे, असे म्हटले आहे; मात्र तरीही जिल्हाधिकारी कामागारांचे वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. हा न्यायालयाचा अवमान असून, या अवमानप्रकरणी जिल्हाधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करून कामगारांची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी कामगार समन्वय समितीने केली आहे.

Web Title: Extend the District Collector