अखेर तूर खरेदी केंद्र सुरु

By Admin | Updated: May 4, 2017 00:32 IST2017-05-04T00:32:18+5:302017-05-04T00:32:18+5:30

मेहकर : मेहकर येथे नाफेडमार्फत सुरु केलेले तूर खरेदी केंद्र गेल्या काही दिवसांपासून बंद होते. शेतकरी हैराण झाले होते तर अखेर ३ मे पासून मेहकर येथील तूर खरेदी केंद्र सुरु झाले.

Eventually the Tire purchase center started | अखेर तूर खरेदी केंद्र सुरु

अखेर तूर खरेदी केंद्र सुरु

मेहकर : मेहकर येथे नाफेडमार्फत सुरु केलेले तूर खरेदी केंद्र गेल्या काही दिवसांपासून बंद होते. शेतकरी हैराण झाले होते तर अखेर ३ मे पासून मेहकर येथील तूर खरेदी केंद्र सुरु झाले. सध्यातरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावर्षी शासनाने नाफेडमार्फत प्रत्येक ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरु केले होते; मात्र या तूर खरेदी केंद्रावर तुरीची आवक वाढली होती. बारदाना नसल्याने खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने खरेदी केंद्र बंद होते. सदर केंद्र सुरु व्हावे यासाठी बाजार समिती सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे यांनी वेळोवेळी मागणी करुन पाठपुरावा केला होता. दरम्यान, उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश अपार, तहसीलदार संतोष काकडे यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर केल्या.

Web Title: Eventually the Tire purchase center started