शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही ‘छळ’इथला संपत नाही!

By admin | Updated: September 18, 2014 00:44 IST

खामगाव तालुक्यातील स्मशानभूमी नसल्यामुळे अनेक गावात प्रेतांची अवहेलना.

खामगाव : सरणावर जातांना इतुकेच कळले होते.. मरणाने केली सुटका..जगण्याने छळले होते. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला सर्व यातनांतून मुक्ती मिळते असेच उपरोक्त ओळींतून स्पष्ट होते. मात्र, तालुक्यातील अनेक गावांमधील स्मशानभूमीच्या बकाल अवस् थेमुळे माणसांची मरणानंतरही सुटका होत नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे वास्तव असून काही ठिकाणच्या स्मशानभूमीवरील शेड नादुरूस्त आहे. तर अनेक गावांमध्ये स्मशानभूमींना जोडणार्‍या रस्त्याची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे.मृत्यू कुणालाही चुकत नाही. हे शास्वत सत्य असून जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मृत्यूला सामोरे जावे लागते. मनुष्याच्या जीवनातील सर्वात शेवटचा सो पस्कर म्हणजे अंत्यसंस्कार हाच आहे. मनुष्याचा शेवट चांगला व्हावा अशीच धारणा प्रत्येकाची असते. तर मृत्यूमुखी पडलेल्या इसमावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार यासाठी जवळच्या नातेवाईकांची धडपड असते. मात्र, स्मशानभूमीच्या बकाल अवस्थांमुळे मृत्यूनंतरही यातना साथ सोडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील १४ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेल्या स्मशानभुमी शेडची दुरवस्था झाल्याने आजही उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे चित्र आहे.माणूस जिवंत आहे तो पर्यंत सुखा समाधानाने जगण्याचा प्रयत्न करतो. जिवंतपणी विविध समस्यांना तोंड देत जगावे लागत असतांना मरणानंतरही त्या सुटत नाहीत. शासन विविध योजनाव्दारे समाजतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहे. अनेक गावात स्मशानभुमीकडे जाण्याकरिता रस्ता नाही. पाण्याची सोय नाही. लोखंडी शेडची टिनपत्रे खराब झाली तर काही ठिकाणी बेपत्ता आहेत. स्शमान शेडमधील सिमेंटचे फ्लोरींग उखडले आहे. उन्हाळा व पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार करताना नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गावागावातील स्मशानभुमीच्या विकासासाठी व सुविधा पुरविण्यासाठी संबंधितांकडून प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.