शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांच्या ई-लर्निंगमध्ये भाड्याच्या इमारतींमुळे खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:51 IST

बुलडाणा- ई-लर्निंगची सुविधा देण्यासाठी इमारत अंगणवाडीच्या मालकीची असण्याची अट शासनाने घातली आहे; मात्र ९० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

हर्षनंदन वाघ - बुलडाणाई-लर्निंगची सुविधा देण्यासाठी इमारत अंगणवाडीच्या मालकीची असण्याची अट शासनाने घातली आहे; मात्र जिल्"ात ९० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. अंगणवाड्या उभारण्यासाठी निधी देण्यात आला असला, तरीही विविध कारणे पुढे करून नगरपालिका असहकार्य करीत असल्यामुळे अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे जिल्"ातील अंगणवाड्यांना ई-लर्निंग सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे.‘गाव तेथे अंगणवाडी’ असा उपक्रम शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या माध्यमातून राबविला जातो. या उपक्रमातंर्गंत गावागावात अंगणवाड्या मंजूर झाल्या, त्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसही नियुक्त करण्यात आले. मात्र जिल्"ात अनेक गावांमध्ये आजही अंगणवाड्या चावडी, मंदिर किंवा शाळेच्या वऱ्हांड्यात भरत आहेत. आता मालकीची इमारत असणाऱ्या अंगणवाड्यांना ई-लर्निंगची सुविधा देण्यात येणार आहे. मात्र या अंगणवाडीच्या इमारतीसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाकडून निधी मिळाल्यानंतरही नगरपालिका प्रशासन असहकार्य करीत आहे. त्यामुळे जिल्"ातील शहरीभागात जवळपास ९० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत भरत असल्याचे वास्तव आहे.