शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंधांमुळे 'वीक एण्ड'ला रस्त्यावर शुकशुकाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 11:27 IST

Lockdown in Buldhana : शनिवार व रविवारी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात शनिवार व रविवारी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळाला. ५ ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केल्याने व्यापाऱ्यांमधून या लाॅकडाऊनला विरोध दर्शविण्यात येत आहे; मात्र, शनिवारी अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ६ एप्रिल रोजी सुधारित आदेश लागू केले होते. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. शनिवार व रविवार कडक निर्बंध असल्याने शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला; परंतु सकाळी ११ पर्यंत काही ठिकाणी नागरिकांची गर्दी होती. दरम्यान, पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना तंबी दिली. त्यामुळे दुपारनंतर अनेक रस्त्यावरील गर्दी कमी झाली होती. सर्व दुकाने बंद दिसून आली. बुलडाणा शहरात दिवसभर रस्ते निर्मनुष्य झाले होते. क्वचितप्रसंगी दुचाकीवर एखाद दोन व्यक्ती जाताना दिसत होत्या. अशीच स्थिती मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मोताळा, खागाव, मलकापूर, शेगाव, नांदुरा शहरांमध्ये होती. 

प्रवास करण्यास मुभाशनिवार व रविवारी संचारबंदीच्या काळात रेल्वे, बस यातून प्रवास  करून आगमन होणाऱ्या प्रवाशांनी अधिकृत तिकीट बाळगावे. जेणेकरून त्यांना निर्बंधांच्या काळात स्थानकापर्यंत किंवा त्यांच्या घरापर्यंत जाणे सोयीचे होईल, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. औद्योगिक कामगारांना कामाच्या शिफ्टनुसार कामाचे ठिकाणी जाण्या-येण्यासाठी त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत अथवा शनिवार, रविवार निर्बंधांच्या काळात, खासगी बस, वाहनाने प्रवास करण्यास मुभा आहे. 

नियम मोडणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाईबुलडाणा :  जिल्ह्यात शासनाने लागू केलेल्या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, जीवनाश्वयक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असतानाही दुकाने बंद आहेत की सुरू, याबाबत पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती स्वत: बुलडाणा शहरात रस्त्यावर उतरले. निर्बंधांचे आदेश मोडणाऱ्या काही दुकानांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्यांना नियमानुसार दंड ठोठावला. कारवाई करताना जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्गापासून स्वत: चे व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे व हात वारंवार धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत, शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस