शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीमुळे अपघातांच्या प्रमाणात निश्चितच घट होईल!

By admin | Updated: April 19, 2017 23:47 IST

लोकमत परिचर्चेतील सूर : महामार्गालगत दारूबंदीचा निर्णय स्वागतार्ह

बुलडाणा : राज्य महामार्गावर होणाऱ्या अपघातास दारू पिवून वाहन चालविणारे कारणीभूत असतात. त्यामुळे न्यायायलाने एका निर्णयान्वये राज्य महामार्गालगत ५०० मीटर व २० हजार लोकसंख्या असलेल्या गाव परिसरातील २५० मीटरलगत असलेले बीअर बार व वाईन शॉप बंदीचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊन अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा सूर बुधवारी राज्य महामार्गालगत दारूबंदीमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल का? या विषयावर आयोजित परिचर्चेत उमटला. राज्य महामार्ग किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या अपघातास ९० टक्के दारू कारणीभूत असते. दारू पिल्यामुळे अपघात होत असतात. त्यामुळे अनेकांना जायबंदी व्हावे लागते, तर काही कुटुंबीयांना सदस्य गमवावे लागतात. दारू पिण्यामुळे राज्य महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या एका आदेशान्वये संपूर्ण राज्यात राज्य महामार्गावरील बीअर बार व वाईन शॉप बंद करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे राज्य महामार्गावर दारू सहज उपलब्ध होणे कठीण झाले आहे. या निर्णयामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे, तर राज्य महामार्गावर दारूबंदी केली असली, तरी अवैधरीत्या दारू विक्री सुरूच आहे. त्यामुळे संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे काहींनी सांगितले.दारूबंदीचा निर्णय चांगला असून, नवीन परवाने मिळण्यासाठी अडचणीचे जाणार असून, आपल्या गाव परिसरात परवाने मिळू नये म्हणून अनेक महिला विरोध करणार असल्याच्या प्रतिक्रिया सहभागी मान्यवरांनी व्यक्त केल्या.अपघात झाल्यानंतर जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. त्यातील अनेक रुग्णांचे अपघात दारू पिल्यामुळे झालेले असतात, तर काही अपघातात वाहन चालकाने दारू पिल्यामुळे अपघात होऊन समोरील वाहनचालकांना जखमी केलेले असते. त्यामुळे अपघातासाठी जी कारणे कारणीभूत आहेत, त्यात दारू पिल्याचे कारण जवळपास ९० टक्के अपघाताच्या घटनेस कारणीभूत आहे. त्यामुळे न्यायालयाने राज्य महामार्गवर सहज उपलब्ध होणारी दारूबंदी केल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. - डॉ. अशोक भवटे, बुलडाणा.राज्य महामार्गालगत दारू विक्रीची दुकाने असल्यामुळे प्रवासी किंवा वाहन चालकाला दारू सहज उपलब्ध होत असते. त्यातही स्वस्त दारू मिळत असते. त्यामुळे महामार्गालगत होणारे अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येते. न्यायालयाने महामार्गालगत दारू विक्री बंद केल्यामुळे प्रवासी किंवा वाहन चालकाला दारू सहज उपलब्ध होणार नाही. तसेच महामार्गापासून दारू विक्री काही अंतरावर होत असल्यमुळे प्रवासी किंवा वाहन चालकाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. अशा अनेक कारणांमुळे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल.- अ‍ॅड. शरद राखोंडे, बुलडाणा.राज्य महामार्गालगत झालेली दारूबंदीचा काही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अनेक प्रवासी किंवा वाहनधारकांना अवैधरीत्या दारू मिळत आहे. त्यामुळे अपघात होत असल्याचे दिसून येते. अपघाताचे प्रमाण कमी करायचे असेल, तर संपूर्ण दारूबंदी करणे आवश्यक आहे. दारू पिणाऱ्याला दारू मिळत असल्यास सहज उपलब्ध होत असते. त्यामुळे संपूर्ण दारूबंदी झाल्यास प्रवासी किंवा वाहनधारकांना दारू मिळणार नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल. यासाठी संपूर्ण दारूबंदी करणे आवश्यक आहे.- ज्ञानेश्वर वायाळ, अध्यक्ष, माध्य. व उच्च. शिक्षक संघटना, जि.प.,बुलडाणा.राज्य महामार्गावर दारू पिवून बेधुंद गाडी चालविणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले होते. दारू पिवून गाडी चालविणारे स्वत:सोबत इतरांचा जीव धोक्यात आणत होते. वेळोवेळी होणारे भीषण अपघात त्याचे बोलके उदाहरण आहे. नवीन निर्णयामुळे आता राज्य महामार्गावर दारू मिळणार नसल्यामुळे नेहमी होणाऱ्या अपघातावर नियंत्रण येईल. दारू पिवून अपघातात जायबंदी होणाऱ्या व्यक्तींचे फार मोठी संख्या आहे. अपघाताचे परिणाम त्यांना जन्मभर भोगावे लागतात. अनेकांना जीवन जगणे कठीण होते. त्यामुळे महामार्गालगत होणारी दारू विक्री बंदीचा निर्णय चांगला व स्वागतार्ह आहे.- मृणालिनी पाथरकर, सदस्य, संत सेवा संघ, बुलडाणा.महामार्गालगत होणारे अपघात फार भीषण असतात. अशा अपघातात सर्वच कुटुंब नष्ट झाल्याचा घटना घडलेल्या आहेत. महामार्गालगत झालेल्या घटना दारू पिवून झालेल्या असल्याचे दिसून येते. दररोज घडणाऱ्या अपघातामध्ये दारू पिवून झालेल्या अपघाताचे प्रमाण ५० ते ६० टक्के आहे. अपघात हे दारू पिल्यामुळेच होतात, म्हणून उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय अतिशय चांगला व स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करणे आवश्यक आहे.- वैशाली राठोड, बुलडाणा.