पाळण्याचा फास लागल्याने इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: May 1, 2017 01:24 IST2017-05-01T01:24:43+5:302017-05-01T01:24:43+5:30

नांदुरा : पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील डिघी येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.

Due to the absence of a passing abortion, your death | पाळण्याचा फास लागल्याने इसमाचा मृत्यू

पाळण्याचा फास लागल्याने इसमाचा मृत्यू

नांदुरा तालुक्यातील डिघी येथील घटना

नांदुरा : पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील डिघी येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.
नांदुरा तालुक्यातील डिघी येथील रहिवासी रमेश वाघ (वय ६०) यांना वर्षभरापूर्वी पॅरालिसीस (लखवा) चा अटॅक आल्याने ते घरातच अंथरूणावर खिळले होते. उपचाराने काही महिन्यांपासून ते काठी टेकवित थोडेफार चालायचे. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते घरातीलच मागच्या खोलीत काठी टेकवीत गेले असता त्यांच्या हातातील काठी निसटली व ते नातवंडांसाठी केलेल्या पाळण्याच्या दोरीमध्ये अडकले व त्यांना फास लागला. लखव्यामुळे हात-पाय निकामी असल्याने त्यांना स्वत:ची सुटका करता आली नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे डिघीसह परिसरात शोककळा पसरली आहे. रमेश वाघ यांच्या पश्चात ४ मुले, सुना, ४ मुली व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Due to the absence of a passing abortion, your death