कौतुक नको, स्मारकाचे संरक्षण करा

By Admin | Updated: January 28, 2015 00:07 IST2015-01-28T00:07:30+5:302015-01-28T00:07:30+5:30

स्वखर्चातून उभारलेल्या चिखली तालुक्यातील शहीद स्मारकाचे लोकार्पण.

Do not appreciate it, protect the monument | कौतुक नको, स्मारकाचे संरक्षण करा

कौतुक नको, स्मारकाचे संरक्षण करा

चिखली (बुलडाणा): माझ्या पतीने गाजविलेली शौर्य गाथा पुढच्या पिढीला कळावी व त्यांच्या देशसेवेपासून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे स्मारक उभारले आहे. यासाठी मला कौतुकाची थाप नको. या स्मारकाचे पावित्र्य राखण्यासाठी सरंक्षण भिंत तेवढी द्या, अशी माफक अपेक्षा वीर पत्नी मिनाबाई जाधव यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील शेलूद येथील शहीद दिलीप जाधव यांच्या स्मृती व त्यांच्या शौर्याची प्रेरणा कायम राहावी, यासाठी मिनाबाई दिलीप जाधव या वीर पत्नीने तब्बल १४ वर्षे वाट पाहिल्यानंतर पदरमोड करून उभारलेल्या शहीद स्मारकाचा लोकार्पण सोहळा २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी भावनिक वातावरणात पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नायब तहसीलदार श्याम धनमाने, ठाणेदार विजयसिंह राजपूत, चिखलीचे माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, सरपंच रामकृष्ण साळवे प्रामुख्याने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर शहिद दिलीप जाधव यांच्या स्मारकस्थळास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

Web Title: Do not appreciate it, protect the monument