शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शांती महोत्सवात हजारो ‘ओटीं’चे वितरण !

By admin | Updated: October 16, 2014 23:35 IST

खामगाव येथे शतकाची परंपरा, श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाचा उपक्रम.

अनिल गवई/खामगाव(बुलडाणा)शहरात सार्ज‍या होणार्‍या शांती महोत्सवात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यातील भाविक आई जगदंबेचरणी (मोठी देवी) आपली श्रद्धा प्रकट करतात. या महोत्सवात हजारो भाविकांनी दान केलेले विविध साहित्य नि:स्वार्थ भावनेने गरीब, गरजवंतांना वाटप केल्या जाते. गेल्या शंभर वर्षांंपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. त्यामुळे आजवर दरवर्षी हजारो ह्यओटींह्णसह साड्यांचे वितरण करण्याचा सेवाभावी उपक्रम राबविल्या जात असल्याने ह्यतेरा तुझको अर्पण..ह्ण या ओळींची प्रचिती श्री जगदंबा (मोठी देवी) सार्वजनिक उत्सव मंडळाकडून ठायीठायी येत आहे.विजयादशमीला असुरांचा संहार केल्यानंतर क्रोधीत झालेल्या देवीला शांत करण्यासाठी कोजागिरी पोर्णिमेपासून पुढील अकरा दिवस मोठी देवीची मनोभावे पूजा-अर्चा करणारे खामगाव हे शहर राज्यातील एकमेव शहर आहे. सन १९0८ पासून अखंडितपणे शांती उ त्सव साजरा होत असतो. सेवाभाव या प्रमुख वैशिष्ट्याला मंडळाचे पदाधिकारी श्रद्धेने जपत आहेत. आतापर्यंंत मंडळाने कोट्यवधी ओटींचे आणि साड्यांचे वितरण केले आहे. ही परंपरा केवळ शांती महोत्सवातच राखल्या जात आहे. *घरात वर्षभर ठेवली जाते ओटीशांती उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेले भाविक साडी, चोळी, खण, नारळासह देवीची ओटी भरतात व मोठी देवीचे मनोभावे दर्शन घेतात. मोठी देवीच्या दरबारात दाखल होणार्‍या प्रत्येक भाविकाला लहान देवी मागील सभागृहात ओटी आणि पूजेचे साहित्य दिले जाते. या सभागृहातून शांती उत्सवात २४ तास ओटींचे वितरण केल्या जाते. एका दिवशी सरासरी ८00 ते ९00 ओटींच्या वितरणाच्या या परंपरेला शतकाचा कालावधी लोटल्याने आतापर्यंंत कोट्यवधी ओटींचे वाटप मंडळाकडून झाले आहे. ही ओटी भाविक वर्षभर घरात ठेवतात. पुन्हा दुसर्‍यावर्षी दर्शनाला आल्यानंतर नवीन ओटी मिळाली की, जुन्या ओटींचे भाविक विसर्जन करतात. त्यामुळे देवीच्या दरबारातून मिळणार्‍या ओटींचे भाविक मनोभावे वर्षभर पूजन करतात.