शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे हाेणार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST

बुलडाणा : जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील लाभार्थ्यांना विशेष घटक योजनेनुसार ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे ...

बुलडाणा : जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील लाभार्थ्यांना विशेष घटक योजनेनुसार ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे व शेळी गट वाटप करावयाचे आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू झालेली आहे. अर्ज १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे.

दुधाळ जनावरे / शेळी गटासाठी एका कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थ्याने अर्ज करावा, अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील व दारिद्र्य रेषेखालील असावा, अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने सदर योजनेचा याआधी लाभ घेतलेला नसावा, ही योजना ७५ टक्के शासकीय अनुदान व २५ टक्के बँकेचे अर्थसहाय्य अशा स्वरूपाची असल्यामुळे अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा, अर्जदारास १ मे २०११ नंतर तिसरे अपत्य नसावे याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा लागणार आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती सभापती राजेंद्र पळसकर व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे यांनी केले आहे.