शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
4
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
5
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
6
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
7
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
8
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
9
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
10
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
11
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
12
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
13
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
14
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
15
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
16
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
17
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
18
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
19
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
20
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
Daily Top 2Weekly Top 5

मेहकरातील एसटीडी सेवा पडली ओस

By admin | Updated: May 15, 2014 00:39 IST

एसटीडी बुथकडे मोबाईलमुळे कोणी फिरकत नसून ते पूर्णपणे ओस पडले आहेत.

मेहकर : गेल्या १0 वर्षापूर्वी आपल्या नातेवाईकांसह देश विदेशामध्ये संपर्क साधण्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या दूरसंचार विभागाच्या एसटीडी बुथकडे मोबाईलमुळे कोणी फिरकत नसून ते पूर्णपणे ओस पडले आहेत. एकेकाळी दूरध्वनी हा फक्त पैसेवाल्या लोकांकडे आहे असा समज होता. एखाद्या माणसाला दूरध्वनी करायचा असेल तर दूरसंचार कार्यालयात जावून तेथे ट्रंककॉल बुक करावा लागत होते. मात्र दूरसंचार विभागाने १९९२ च्या दरम्यान एसटीडी सेवा सुरु केली व ती बघता बघता प्रचंड लोकप्रिय झाली. दूरसंचार विभागाने एसटीडी बुथला परवानगी दिल्यामुळे लाखो बेरोजगारांना काम उपलब्ध झाले. शहरापासून ग्रामीण भागातील गल्ली बोळातही एसटीडी बुथ सुरु झाले होते. छोटे छोटे व्यापार्‍यांनी तर साईड बिझनेस म्हणून बुथ सुरु केले. काचेची कॅबीन, त्याला अँल्युमिनीयमची फ्रेम अशा आकर्षक पद्धतीने बुथ असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे. कित्येक वर्षे बुथवर दरध्वनी करण्यासाठी लोकांच्या रांगा व गर्दी असायची. अवघ्या १ रुपयांत कोठेही बोला, असे बोर्ड सर्वत्र दिसायचे. मात्र ५ ते ६ वर्षात मोबाईलच्या रुपाने क्रांतीच झाली. सुरुवातीला मोबाईलवर आऊटगोईंग आणि इनकमिंगला पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे हि सेवाही पैसेवाले लोकांसाठी आहे, असे वाटत होते. परंतु काही काळातच त्यात मोठे बदल होवून ही सेवा देशभरात पसरली. मोबाईलचे दर अत्यंत कमी झाले आहेत.त्यामुळे हमाल, रिक्षावाल्यापर्यंत प्रत्येकांच्या हातात मोबाईल दिसत आहे. त्यामुळे एसटीडी बुथ सेवा सर्वत्र ओस पडलेली आहे. बस स्टेशनवर ही अंध, अपंगांसाठी राखीव ठेवलेल्या बुथवरही आता केवळ क्वाईन बॉक्सवर उपजीविका करावी लागत आहे, एव्हढे मात्र निश्‍चीत!