कार्बाईडने पिकविलेले अडीच क्विंटल आंबे नष्ट

By Admin | Updated: May 6, 2014 20:40 IST2014-05-06T18:47:37+5:302014-05-06T20:40:55+5:30

आठवडी बाजारातील एका गोडाऊनमध्ये टाकलेल्या धाडीत अडीच क्विंटल आंबा कार्बाईडने पिकवित असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे आंबे जमिनीमध्ये गाडून नष्ट करण्यात आले.

Destroy the two-and-a-half quintile mangoes grown by carbide | कार्बाईडने पिकविलेले अडीच क्विंटल आंबे नष्ट

कार्बाईडने पिकविलेले अडीच क्विंटल आंबे नष्ट

 

शेगाव : ग्राहकांच्या आरोग्यास घातक असलेल्या कार्बाईडने शेगावात आंबे पिकविल्या जात असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाला मिळाल्यावरुन आज सोमवारी आठवडी बाजारातील एका गोडाऊनमध्ये टाकलेल्या धाडीत अडीच क्विंटल आंबा कार्बाईडने पिकवित असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे आंबे जमिनीमध्ये गाडून नष्ट करण्यात आले. शेगाव येथील सैय्यद हसन सैय्यद कालू यांच्या आठवडी बाजारस्थित फळांच्या गोडावूनवर खामगाव येथील अन्न व औषधी प्रशासनाने धाड टाकली असता या गोडावूनमध्ये आंबे कार्बाईडने पिकविल्या जात असल्याचे आढळले. यावरून आंब्यांचा पंचनामा करुन अडीच क्विंटल आंबे शहराबाहेरील घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ जेसीबीने खड्डा करून त्यामध्ये गाडून नष्ट करण्यात आले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस. अजिंठेकर, एम.आर.गोसलवार, ढोले यांनी केली.

Web Title: Destroy the two-and-a-half quintile mangoes grown by carbide