शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक आकाशदिव्यांना मागणी

By admin | Updated: October 17, 2014 23:33 IST

आली दिवाळी, खामगावात स्टॉल सजले; बाजारपेठांमधील गर्दी वाढली.

खामगाव (बुलडाणा) : दीपावलीचा अविभाज्य भाग असणारे नानाविध प्रकारचे आकाशकंदील बाजारपेठेत दाखल झाले आहेत. यामध्ये चायना मेड आकाशदिव्यांचाही समावेश आहे. चायना मेड आकाशदिवे कमी किमतीत उपलब्ध असले तरीही शहर आणि तालुक्यातील जनतेची पारंपरिक पद्धतीच्या आकाशदिव्यांनाच मागणी आहे. शहरातील विविध विक्रेते प्रामुख्याने नागपूर, मुंबई आणि इंदौर येथून आकाशदिवे मागवितात.दीपावली पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेतील अनेक दुकाने आकाशदिव्यांनी सजली आहेत. आकाशकंदील आकर्षक दिसण्यासाठी मुख्यत्वे प्लॅस्टिक आणि मेटल पेपरपासून बनविण्यात येतात. परंतु यामुळे पर्यावरणाची हानी होते. कारण सहसा एकदा दीपावलीत वापरलेला आकाशदिवा नंतर कोणी वापरत नाही. प्रत्येकवेळी नवीन आकाशदिव्यांची खरेदी करण्यात येते. पर्यावरण संवर्धनासाठी मागील काही वर्षांपासून पर्यावरणपूरक वस्तू बनविण्याकडे कल वाढला आहे. कागद व कापडापासून बनविलेले आकाशदिवेही विक्रीस आहेत. या आकाशकंदिलांच्या किमती सामान्यांना परवडतील अशा १00 रुपये ते ३00 रुपयांदरम्यान आहेत. इको फ्रेंडली आकाशदिव्यांनाही पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. बहुतांशी सर्वच आकाशकंदील घडीच्या प्रकारात उपलब्ध आहेत. पारंपरिक पध्दतीने बनविण्यात आलेल्या आकाशदिव्यांना इतर सर्व प्रकारांपेक्षा अधिक पसंती आहे. सध्या बाजारपेठेत ५0 ते ६0 प्रकारचे आकाशकंदील उपलब्ध आहेत.