धनादेश अनादरप्रकरणी शिक्षा

By Admin | Updated: January 14, 2015 23:48 IST2015-01-14T23:48:01+5:302015-01-14T23:48:01+5:30

खामगाव न्यायालयाचा निकाल.

Defamation Defamation Education | धनादेश अनादरप्रकरणी शिक्षा

धनादेश अनादरप्रकरणी शिक्षा

खामगाव (बुलडाणा): धनादेश अनादर प्रकरणी एकास ६ महिने शिक्षा व ५00 रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल आज बुधवारी येथील न्यायालय क्र.१ चे न्यायाधीश नेरलीकर यांनी दिला. येथील दीपक मोतीराम गुरवाणी यांनी २00८ मध्ये मनिष मेघराज भागदेवाणी यांना व्यवहाराकरिता खामगाव अर्बन बँकेचा १ लाख ३0 हजाराचा धनादेश दिला होता. सदर धनादेश वटवून मनिष भागदेवाणी यांनी रक्कम घेवून व्यवहार चालविला. मात्र सदर व्यवहाराची पतरफेडीकरिता मनिष भागदेवाणी यांनी दीपक गुरबाणी यांना स्टेट बँक ऑफ इंडियाचा १ लाख ३0 हजाराचा धनादेश दिला होता. मात्र सदर धनादेश वटविण्यासाठी दीपक गुरबाणी यांनी बँकेत दिला असता पुरेशी रक्कम नसल्याने अनादरीत झाला होता. त्यामुळे दीपक गुरबाणी यांनी फौजदारी दाखल केली होती. या प्रकरणी आज स्थानिक न्यायालय क्र.१ चे न्यायाधीश नेरलीकर यांनी निकाल देवून मनिष मेघराज भागदेवाणी यांना धनादेश अनादर प्रकरणी ६ महिने शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. फिर्यादीच्यावतीने अँड.डी.सी. नागराणी यांनी काम पाहिले.

Web Title: Defamation Defamation Education