कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By Admin | Updated: April 14, 2017 23:06 IST2017-04-14T23:06:49+5:302017-04-14T23:06:49+5:30

धामणगाव बढे- मोताळा-खेडी येथील रामदास दगडू दांडगे या वृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून १४ एप्रिल रोजी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

Debt Farmer Suicide | कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील खेडी येथील शेतकरी रामदास दगडू दांडगे (वय ७५) या वृद्ध शेतकऱ्याने सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. घटनेनंतर तातडीने त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या शेतकऱ्याच्या एकत्रित कुटुंबात एकूण १५ एकर शेती असून, त्यांच्याकडे स्टेट बँकेचे अडीच लाख रुपये कर्ज आहे. त्यांच्या नावावर १० एकर शेती असून, पत्नी व तीन मुलांच्या नावे पाच एकर शेती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी रामदास दगडू दांडगे चिंताग्रस्त होते. शेवटी १४ एप्रिल रोजी विषारी द्रव्य प्राशन करून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्त्यारसिंग राजपूत उपस्थित होते.

Web Title: Debt Farmer Suicide