शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

By admin | Updated: May 2, 2017 23:54 IST

वडगाव तेजन : सुलतानपूरकडून लोणारकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती-पत्नी यांचा मृत्यू झाला.

वडगाव तेजनजवळ अपघात : अज्ञात रेतीच्या वाहनाची धडकवडगाव तेजन : सुलतानपूरकडून लोणारकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती-पत्नी यांचा मृत्यू झाल्याची घटना २ मे रोजी सकाळी वडगाव तेजनजवळ घडली.बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील संजय प्रभाकर चौथे (४५) व संगीता संजय चौथे (३५) हे पती-पत्नी दोघे एम.एच.२८ क्यू. १३६० या मोटारसायकलवरून लोणारकडे सावडण्याच्या कार्यासाठी जात असताना वडगाव तेजनजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहन हे रेतीचे असल्याचे समजते. हे वाहन लोणारकडून रेती घेऊन मेहकरकडे जात होते. मोटारसायकल व रेती वाहन यांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून लोणार पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गावकरी व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने त्यांना शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत. या रोडने रेती वाहतूक करणारी वाहने जोरात धावतात, त्यामुळे मोटारसायकलस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तरी रेती वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना वेगाची मर्यादा बांधून देण्यात यावी, तसेच रेतीचे वाहन रस्त्याने जात असताना ती पूर्णपणे झाकलेली असावी, अन्यथा रेतीचे कण उडून वाहनचालकांच्या डोळ्यामध्ये जावून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायपूर गावावर शोककळापिंपळगाव सैलानी : बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती - पत्नीचा लोणार गावाजवळ अज्ञात वाहनाने-मोटारसायकलच्या धडकेत बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील संजय प्रभाकर चौथे, पत्नी संगीता संजय चौथे हे सुलतानपूर गावाला रक्षाविसर्जनासाठी जात असताना वडगाव तेजनजवळ या दोघावर काळाने झडप घातली व दोघे जागेवरच ठार झाले. चौथे कुटुंबाचे गावोगावी जावून स्टील भांडी विक्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.त्यांच्या पश्चात अश्वीनी चौथे (२० वर्ष), पल्लवी चौथे व दहा वर्षाचा मुलगा हर्षल चौथे असे तीन मुले आहेत.लहान मुलगा एसटीने गेल्याने प्राण वाचलेदहा वर्षीय मुलगा हर्षल त्यांच्यासोबतच चिखलीपर्यंत होता; परंतु मुलाने मामाच्या घरी जालना येथे जाण्याचा हट्ट धरल्याने त्याला चौथे कुटुंबीयाने जालन्याच्या एसटी बसमध्ये बसून ते सुलतानपूरसाठी रवाना झाले; परंतु रस्त्यानेच त्यांच्यावर काळाने झडप घातली. घरातल्या दोन्ही कर्त्या व्यक्ती गेल्याने या लहान मुलांवर संकट कोसळले आहे.