मृत अर्भक विहिरीत आढळले

By Admin | Updated: May 30, 2014 00:37 IST2014-05-29T23:29:15+5:302014-05-30T00:37:21+5:30

मोताळा तालुक्यातील पलढग शिवारातील विहिरीत मृत कन्या अर्भक विहिरीत आढळले.

The dead infant found in the well | मृत अर्भक विहिरीत आढळले

मृत अर्भक विहिरीत आढळले

मोताळा: तालुक्यातील कोथळी येथील पलढग शिवारातील एका विहिरीमध्ये मृत अर्भक बांधलेल्या गाठोड्यामध्ये दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आज गुरुवारी २९ मे रोजी उघडकीस आलेल्या या घटनेची तक्रार शेतमालक सातव यांनी दिल्यावरून बोराखेडी पोलिसांनी या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे. कोथळीलगतच्या पलढग शिवारातील विहिरीमध्ये पाच ते सात दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेमध्ये आढळून आले. शेतामध्ये काम करीत असलेल्या एका बाईला विहिरीमध्ये साडीच्या कपड्यात बांधलेले गाठोडे दिसले. त्यांनी विहिरीतून गाठोडे काढून पाहले असता, पाच ते सात दिवसांचे कुजलेल्या अवस्थेतील मृत अर्भक दिसून आले. या घटनेची माहिती तत्काळ बोराखेडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून आठवडाभरापूर्वी नवजात अर्भकाला कोणीतरी विहिरीत फेकल्याची शक्यता व र्तविली.

Web Title: The dead infant found in the well