शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू बुधवारी प्रथमच खामगावात

By admin | Updated: February 8, 2016 02:19 IST

डॉ. सैयदना आलीकदर मुफद्दल सैफुद्दिन हे बुधवार १0 फेब्रुवारी रोजी खामगाव येथे येत आहेत.

खामगाव: दाऊदी बोहरा समाजाचे ५३ वे धर्मगुरू डॉ. सैय्यद मोहंमद बुरहानुद्दिन यांचे पुत्र डॉ. सैयदना आलीकदर मुफद्दल सैफुद्दिन हे बुधवार १0 फेब्रुवारी रोजी खामगाव येथे येत आहेत. धर्मगुरू प्रथमच खामगावात येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी शहरात बोहरा समाजबांधवांच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यानिमित्ताने शहरातील जगदंबा चौकात असलेल्या बोहरा समाजाच्या मशिदीची साफसफाई करून रंगरंगोटी करण्यात आली, तसेच आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या दौर्‍यादरम्यान धर्मगुरू डॉ. सैयदना आलीकदर मुफद्दल सैफुद्दिन हे शहरातील जलालपुरा, तलाव रोड आदी भागात राहणार्‍या बोहरा समाजबांधवांच्या घरीसुद्धा भेट देतील. त्यांच्या घरी होणार्‍या आगमनामुळे अनेकांनी घरावर सोबतच दुकानांवरही रोषणाई केली. १0 रोजी सकाळी मलकापूर मार्गे खामगावात आल्यानंतर स्थानिक गो.से. महाविद्यालयाजवळ स्वागत करण्यात येणार असून, तेथून मोटारसायकल रॅली काढून बोहरा मशिदीपर्यंंंत आणण्यात येणार आहे. त्यानंतर १0.३0 वाजता बोहरा मशीदमध्ये ते समाजबांधवांना उपदेशपर प्रवचन करतील. प्रवचनानंतर शहरातील बोहरा समाजबांधवांच्या घरी भेटी देतील. धर्मगुरू प्रथमच खामगावात येणार असल्याने परिसरातील अकोला तसेच इतर शहरातून सुमारे ३ हजार समाजबांधव या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सुख आणि शांतीचा संदेश देत इस्लामचा खरा अर्थ, सर्वधर्म समभावाची जोपासना, गरिबांना मदत, व्याजापासून दूर राहणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड, स्वच्छता आदींचे महत्त्व पटवून देण्यासाठी धर्मगुरू जगभर फिरत आहेत.