अपंग प्रमाणपत्रासाठी मिळते..तारीख पे तारीख

By Admin | Updated: January 28, 2015 23:38 IST2015-01-28T23:38:50+5:302015-01-28T23:38:50+5:30

बुलडाणा येथील जिल्हा अपंग व पुनर्वसन केंद्रातील प्रकार.

Date of date of receipt for disabled certificate | अपंग प्रमाणपत्रासाठी मिळते..तारीख पे तारीख

अपंग प्रमाणपत्रासाठी मिळते..तारीख पे तारीख

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रात महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या बुधवारी अपंगाची तपासणी करून त्यांना अपंगाचे प्रमाणपत्र देण्यात येते. आज दिनांक २८ रोजी या केंद्रात तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले होते. मात्र नोंदणी झाल्यानंतर अपंगांना अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी एक ते दिड वर्षाच्यानंतरची तारीख दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोग्य विभागाच्या या हलगर्जीमुळे जिल्हाभरातून आलेल्या बर्‍याच अपंगाना पुढील तारीख घेवून परत जावे लागले. युथ वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याकडून अपंग बोर्ड समिती मार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अपंग पुनर्वसन केंद्रात चालविले जाते. प्रत्येक महिण्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या बुधवारी अपंग बोर्डच्यावतीने येथे अपंगाची तपासणी करून त्यांना अपंग असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते. अपंग व्यक्तीच्या सार्वांगिण विकास आणि समाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने नोंदणीकृत अपंगांना आरक्षण दिली. यानुसार अंपगत्वाचे प्रमाणपत्र आणि अपंगाला विविध बाबीसाठीचे आरक्षण प्रमाणपत्र नोंदणीच्या दिवशी किंवा पुढील सात दिवसात देण्यात यावे, असे आदेश असतांनाही आज अपंग बोर्डाकडून आलेल्या बर्‍याच अपंगांना चार महिने ते एक वर्षापर्यतची पुढील तारीख देण्यात आली. तर गत सहा महिने ते एक वर्षापासून वेंटिगवरील काही अपंगांना आज प्रमाणपत्र मिळाले. ज्यांना पुढील तारीख मिळाली त्यांना परत जावे लागले.

Web Title: Date of date of receipt for disabled certificate