पद्मावती धरणात बुडाल्याने दाेन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST2021-04-27T04:35:47+5:302021-04-27T04:35:47+5:30

पारध बु. येथील अभिषेक प्रवीण श्रीवास्तव आणि महेश शंकर काटोले हे दोघे इतर मित्रांसोबत सोमवारी दुपारी शेजारील पद्मावती ...

Daen youths drown in Padmavati dam | पद्मावती धरणात बुडाल्याने दाेन युवकांचा मृत्यू

पद्मावती धरणात बुडाल्याने दाेन युवकांचा मृत्यू

पारध बु. येथील अभिषेक प्रवीण श्रीवास्तव आणि महेश शंकर काटोले हे दोघे इतर मित्रांसोबत सोमवारी दुपारी शेजारील पद्मावती धरणावर पोहण्यासाठी गेले होते.

चौघांपैकी अभिषेक आणि महेश यांनी धरणात पोहण्यासाठी उड्या घेतल्या़ मात्र ज्या ठिकाणी त्यांनी उड्या टाकल्या त्या ठिकाणी पाणी कमी पण गाळ मोठ्या प्रमाणात होता़ ते सरळ त्या गाळात फसले़ बराच वेळ झाला तरी दोघे पाण्याच्यावर न आल्याने पोहता येत नसल्याने काठावर बसलेल्या त्यांचा मित्र घाबरला आणि त्याने आरडाओरडा केला़ मात्र सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे आसपास कोणीच नव्हते़ त्यामुळे त्याने गावात फोन केला़ त्याच क्षणी गावातून ग्रामस्थ मिळेल त्या वाहनाने पद्मावती धरणाकडे धावले़ पोलीस आणि ग्रामस्थांनी मिळून मोठ्या प्रयत्नाने त्या दोघांचे मृतदेह गाळातून बाहेर काढले. पोलिसांनी तत्काळ दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी प्रा. आरोग्य केंद्र पिंपळगाव रेणुकाई येथे घेऊन गेले.

रात्री उशिरापर्यंत पोलीस कायर्वाही करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Daen youths drown in Padmavati dam