शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

वादातून डोके फोडल्याने चौघांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 21, 2017 00:40 IST

खामगाव : पोलीस स्टेशनमधील प्रकरण आपसात मिटविण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या दोघांना पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन वाद घालत युवकास मारहाण केल्याची घटना सजनपुरी येथे घली.

खामगाव : पोलीस स्टेशनमधील प्रकरण आपसात मिटविण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या दोघांना पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन वाद घालत युवकास मारहाण केल्याची घटना सजनपुरी येथे घली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राम नारायण भगतपुरे (वय २५) रा.सजनपुरी याने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की नारायण धनू सावरकर व आदित्य गोपालसेठ यांचा मुलगा या दोघांनी बुधवारी घरी जात असताना रस्त्यात थांबवून तुझी केस आम्ही आपसात मिटवितो, आम्हाला पाच हजार दे, अशी मागणी केली. मात्र, या दोघांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी वाद घालत शिवीगाळ केली, तर नारायण सावरकर याने डोक्यावर मारुन जखमी केले. या फिर्यादीवरुन पोलिसांनी उपरोक्त दोघांविरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. नारायण धनू सावरकर याने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले, की गावातील दुकानावर उभा असताना हिरा तुळशीराम भगतपुरे, आकाश हिरा भगतपुरे व राम नारायण भगतपुरे यांनी पुतण्याला का मारले, म्हणून वाद घालत चापटाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुद्ध कलम ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.