शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल वाटपात सावळा गोंधळ!

By admin | Updated: May 1, 2017 01:03 IST

नांदुरा- तालुक्यात रमाई योजनेतील घरकुल वाटपाच्या सावळ्या गोंधळात योजनेचे निकष न पाळल्यामुळे गरिबांच्या वाट्याची घरे इतरांना दिल्याचे स्पष्ट होत आहे.

संदीप गावंडे - नांदुरानांदुरा तालुक्यात रमाई योजनेतील घरकुल वाटपाच्या सावळ्या गोंधळात योजनेचे निकष न पाळल्यामुळे गरिबांच्या वाट्याची घरे इतरांना दिल्याचे स्पष्ट होत असून शासनानेच ठरविलेले निकष अधिकाऱ्यांनी कशाचे आधारावर नाकारले हे अनाकलनीय आहे.२०१५-१६ आर्थिक वर्ष संपतांना जिल्ह्यात रमाई योजनेचे उद्दिष्ट वाढीव आले. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात हे उद्दिष्ट लोकसंख्येच्या प्रमाणानुसार वाटप करण्यात आले परंतु नांदुरा तालुक्यात सदर वाढीव उद्दिष्टाकरिता लाभार्थ्यांची निवड करताना विशिष्ट ग्रामपंचायतींनाच प्राधान्य दिल्याचे दिसत असून सदर लाभार्थी निवड ही निकषाच्या आधारे करण्यात आली नाही.रमाई आवास योजनेकरिता लाभार्थी दारिद्रय रेषेवरील (एपीएल) असावा असा निकष आहे. मात्र सदर निकषाचे उल्लंघन झाले आहे. तसेच लाभार्थ्यांवर पक्के घर नसावे ही अट असताना यामध्ये पक्के घर असलेले लाभार्थी निवडण्यात आल्याची माहिती आहे. तसेच रमाई आवास योजनेकरिता संपूर्ण तालुक्यातील एपीएल परंतु एक लक्ष रूपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांची यादी (बुकलेट) तयार करून त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंजुरात घ्यावी लागते. मात्र अशी तालुक्याची कोणतीच यादी मंजूर झालेली नाही. त्यामुळे मनमानी कारभार करीत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून सदर लाभार्थ्यांकडे स्वत:ची जागा आहे की नाही? घर कच्चे आहे की पक्के याची कोणतीही शहानिशा संबंधित विभागाने केलेली नाही. त्यामुळे खऱ्या गरजू लोकांना घरकुलापासून वंचीत राहावे लागत आहे. वाढीव उद्दिष्टात मंजूर केलेल्या रमाई आवास योजनेतील नावे ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘ड’ यादीतीलच घेण्यात आली आहेत. त्यामुळे मार्च एडींगच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करीत गरीबांची घरे पळविण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे.पात्र लाभार्थींनाच घरकूल मिळतील याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येईल. रमाई घरकुलाबाबतीत योग्य ती कारवाई निश्चित करण्यात येईल. तसेच प्रपत्र ‘ब’ मध्ये नाव असणाऱ्या एससी, एसटी व अल्पसंख्याक लाभार्थ्यांजवळ स्वत:ची जागा असल्यास त्यांनी स्वत: मला भेटावे त्यांना निश्चित घरकुलाचा लाभ देण्यात येईल. - बी.एम. मेघावत,गटविकास अधिकारी नांदुरा