शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : एसटी महामंडळाला लाखोंचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 14:41 IST

दिवसाकाठी ३ लाख ३६ हजार रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडवत आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना विषाणूचा विविध क्षेत्राला फटका बसला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. जिल्ह्यात दिवसाला ११७ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसाकाठी ३ लाख ३६ हजार रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडवत आहे.कारोना विषाणूची धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे विविध क्षेत्रातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आयात-निर्यात बंद झाल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. पर्यटन, खासगी, मनोरंजन, मॉल्स-रेस्टॉरंट आदी सर्वच क्षेत्रांपाठोपाठ एसटी महामंडळालाही कोरानाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागीय कार्यालयाकडून ग्रामीण भाग व लांब पल्ल्याचे असे एकूण ४४० शेड्यूल धावतात. परंतू कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी लागल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक बंद झाली आहे. बाहेर गावी प्रवास करणारे नागरिकांनीही आता बसस्थानाकवर येणे, एसटी बसने प्रवास करणे कमी केले आहे. कोरोनाच्या भीतीने गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे प्रवाशी टाळत आहेत. त्याचा मोठा फटका हा एसटी महामंडळाला बसला आहे. एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागीय कार्यालयाकडून दिवसाला ११७ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसाकाठी ३ लाख ३६ हजार रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाचे होत आहे. मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात प्रवाशांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.

आठवड्याला २३.५२ लाख रुपयांचे नुकसानशाळा, महाविद्यालय बंद असल्याने काही बसफेºया बंद करण्यात आल्या आहेत. मानव विकासच्या सर्वच बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसाकाळी ३ लाख ३७ हजार याप्रमणे एका आठवड्याचे २३ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाचे होत आहे.

दिवसाचे १२ हजार कि़मी. अंतर रद्दग्रामीण भागासोबतच लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांचे नियोजनही कोलमडले आहे. एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागीय कार्यालयांतर्गत बसफेºयांचे ११ हजार ९९८ कि़मी. अंतर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आठवड्याचे ८३ हजार ९८६ कि़मी. अंतर रद्द झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी