कोरोनामुक्त संकल्प रथाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:34 IST2021-05-14T04:34:18+5:302021-05-14T04:34:18+5:30

तालुक्यातील गुम्मी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांच्यावतीने गुम्मी येथील ...

Coronation-free Sankalp Chariot concludes | कोरोनामुक्त संकल्प रथाचा समारोप

कोरोनामुक्त संकल्प रथाचा समारोप

तालुक्यातील गुम्मी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांच्यावतीने गुम्मी येथील सरपंच दीपाली नंदकिशोर हुंडीवाले, उपसरपंच विठ्ठल कड, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या हस्ते कोरोनामुक्त संकल्प रथाचा समारोप करण्यात आला.

यावेळी माजी जि. प. सदस्य अशोक इंगळे, राजू नरोटे, सुखदेव नरोटे, वसंता नरोटे, नंदकिशोर हुंडीवाले, अशोक इंगळे पो. पाटील, हरिभाऊ कड, जामठी येथील रमेश तायडे, प्राचार्य डवले, जाधव, प्रभू जयस्वाल, विनोद तायडे, विनोद गायकी, रवी गेंदे यांची उपस्थिती होती. याठिकाणी कोरोनामुक्त संकल्प रथाच्या समारोप कार्यक्रमात मनोज दांडगे यांच्या वतीने गावातील नागरिकांना एन.९५ मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.

तथा कोरोनामुक्त रथाच्या माध्यमातून गावात कोरोना लसीकरण, सुरक्षित नागरिक सुरक्षित गाव याबाबत नागरिकांना प्रबोधन करण्यात आले.

मागील वर्षी कोरोनाच्या भयंकर लाटेत असंख्य गोरगरिबांना उपासमारीची वेळ आली असता मनोज दांडगे यांच्या वतीने मासरुळ जि. प. सर्कल मधील प्रत्येक गावात गरजू कुटुंबांना २ हजार ५०० किराणा आणि धान्य किटचे वितरण घरोघरी जाऊन करण्यात आले होते. या ठिकाणी २१ गावांतून जवळपास १५ हजारांपेक्षा अधिक एन ९५ मास्कचे मोफत वितरण त्यांनी केले.

कोरोनामुक्त संकल्प रथ समारोप प्रसंगी ग्रा. पं. कर्मचाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Coronation-free Sankalp Chariot concludes