शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! स्वॅब न देताच कोरोनाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 03:30 IST

बुलडाण्यातील प्रकार; दोषींवर कारवाईची मागणी

मोताळा (जि. बुलडाणा) : स्वॅब न देताच एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार येथील सहकार विद्या मंदिरातील कोविड केअर सेंटरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मोताळा येथील पंडितराव कैलासराव देशमुख हे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी तपासणीसाठी मोताळा येथील कोविड केअर सेंटरला आले होते. या ठिकाणी त्यांचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांकाची नोंद घेण्यात आली. मात्र त्यांना स्वॅब देण्यासाठी दुपारी बोलावण्यात आले. परंतु पंडितराव पुन्हा कोरोना केंद्रात गेलेच नाहीत. दरम्यान, आठवडाभरानंतर शुक्रवार, ५ मार्च रोजी कोविड केअर सेंटरमधील कर्मचाऱ्याने पंडितराव देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. त्यामुळे देशमुख यांना धक्काच बसला. त्यांनी आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवत संताप व्यक्त केला आहे.

‘तो’ स्वॅब दुसऱ्याचाचया प्रकाराबाबत माहिती घेतली असता देशमुख यांनी नोंदणी केल्यावर स्वॅब घेण्यासाठी त्यांच्या नावाचा ट्युब तयार करण्यात आला होता. त्यात दुसऱ्याच व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आरोग्य विभाग पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे.

कोरोनाचा प्रार्दूभाव झाला नसतानाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने देशमुख यांना धक्क बसला असून त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtraमहाराष्ट्रCorona vaccineकोरोनाची लस