शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जेवण न मिळाल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांचा संताप; शेगाव कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 21:28 IST

दुपारपर्यंत जेवण न मिळाल्यानं कोरोना रुग्ण भुकेनं व्याकूळ; विसावा कोविड सेंटरमधील घटना

शेगाव: सकाळचे जेवण दुपारी दोन वाजेपर्यंतही न आल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांनी कोविड सेंटरच्या परिसरात येत संताप व्यक्त केला. शासकीय कोविड सेंटरमध्ये दोनशेहून अधिक पाॅझिटिव्ह रुग्ण असून, शुक्रवारी दुपारपर्यंत जेवण मिळाले नाही. त्यामुळे रुग्ण भुकेने व्याकूळ झाले.

शेगाव येथील विसावा केंद्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोविड उपचार केंद्र आहे. या कोविड केंद्रामध्ये जवळपास ३६० रुग्ण आहेत. दुपारचे जेवण दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत वेळेवर जेवण न येता २ वाजून ३० मिनिटांपर्यंतही या कोविड केंद्रामध्ये जेवण न आल्यामुळे रुग्णांनी संताप व्यक्त केला. तसेच विसावा कोविड केंद्राच्या परिसरात चक्क बाहेर आले. जवळपास २६० रुग्णांनी रस्त्यावर येत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वेळेवर जेवण न मिळणे, निकृष्ट दर्जाचे जेवण व सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत. तक्रारींची कोणीही दखल घेत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर आल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्वांत आधी उपाशी रुग्णांना जेवण देण्याच्या सूचना दिल्या. जेवण उशिरा का देण्यात आले, याबाबत चौकशी केली जाईल. तसेच दोषींवर कारवाई करण्यात येईल.-दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी

जेवण पुरवण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केला आहे. जेवण उशिराचा प्रकार समजताच चौकशी केली असता सिलिंडर संपल्याने जेवण देण्यास उशिर झाल्याचे समजले. रुग्णांना जेवणास विलंब झाल्यामुळे शुक्रवारचे देयक कंत्राटदाराला दिले जाणार नाही.- शिल्पा बोबडेतहसीलदार, शेगाव