शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases : बुलडाणा जिल्ह्यात ५१८ कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 11:21 IST

One dies in Buldana district : १ हजार ४३८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५१८ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १ हजार ९५६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी १ हजार ४३८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५१८ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४३९ व रॅपीड टेस्टमधील ८८ अहवालांचा समावेश आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ६६९ तर रॅपिड टेस्टमधील ७६० अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवालामध्ये बुलडाणा शहरात ८८, बुलडाणा तालुक्यातील माळवंडी, साखळी खू, पांगरी येथे प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सुंदरखेड येथे सहा, कोलवड दोन, येळगाव पाच, माळविहिर एक, रायपूर दोन, नांद्राकोळी दोन, पाडळी एक, मासरुळ एक, तराडखेड एक रुग्ण आढळून आला आहे. खामगांव शहरात ८१, खामगांव तालुक्यात सुटाळा ११, कोक्ता एक, पळशी दोन, अंत्रज, रोहना, गोंधणपुर, विहीगाव तीन, हिवरखेड, संभापुर दोन, आवार पाच, गणेशपूर तीन, घाटपुरी १०, निंभोरा एक, शिरसगाव एक, नांदुरा तालुक्यात निमगाव एक, मलकापूर शहरात सहा, चिखली शहरात २६, चिखली तालुक्यातील शेलूद दोन, भरोसा एक, सवणा दोन, सातगाव भुसारी एक, पळसखेड दौलत चार, धोत्रा भनगोजी एक, उंद्री दोन, केळवद दोन, पांढरदेव, एकलारा, भाणखेड, भोकर, तेल्हारा, सोमठाना, सिंदखेड राजा शहरात २३, सिंदखेड राजा तालुक्यात साखर खेर्डा ७, कंडारी एक, शेंदुर्जन दोन, गोरेगाव सहा, दुसरबिड तीन, पांगरी दोन, शिंदी, बाळ समुद्र, पोफळशिवणी, बारलिंगा, सवडत, हनवतखेड, पिपळगाव लेंडी, राहेरी, शेलू, शेळगाव काकडे येथे प्रत्येक एक रुग्ण आढळून आला आहे. मोताळा तालुक्यातील पिपळगाव देवी दोन, धामणगाव बढे तीन, बोराखेडी एक, कोथळी, जयपूर एक, आव्हा १२, पुन्हई, लिहा, रामगाव एक, मोताळा शहर एक, शेगांव शहर २५, देऊळगाव राजा शहर १८, लोणार शहरात १६, मेहकर शहरात १५ व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान निपाना ता. मोताळा येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा