शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी संमेलन!

By admin | Updated: March 27, 2017 02:31 IST

बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनात श्रीपाद भालचंद्र जोशींनी मांडले परखड मत.

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. २६- केवळ साहित्य व साहित्यिकांचा उदोउदो करणे, कविता आणि गप्पांचे फड रचने, एवढीच जबाबदारी या संमेलनाची नाही. ग्रामीण भागात साहित्य संमेलन आयोजित करण्यामागील उद्देश व्यापक असून, आत्मविश्‍वास गमावलेल्या साहित्यिकांमध्ये आत्मसन्मान निर्माण करण्याचे कार्य संमेलनातून व्हायला हवे, असे मत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तथा संमेलनाचे उद्घाटक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले.श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शेलसूर यांच्या सुवर्ण मोहत्सवी वर्षाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नागपूर आणि विदर्भ साहित्य संघ शाखा बुलडाणाच्या संयुक्त विद्यमाने करवंड येथील स्व. माधवराव देशमुख माध्यमिक आश्रमशाळेत एक दिवसीय जिल्हा मराठी संमेलन २६ मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध गजलकार डॉ. गणेश गायकवाड, चिखलीचे आ. राहुल बोंद्रे, स्वागताध्यक्ष तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष प्रा. सुनील देशमुख, महामंडळाचे अध्यक्ष चिंतामण देशपांडे, डॉ. विलास मानेकर, प्रदीप गोते, संमेलनाचे संयोजक नरेंद्र लांजेवार, प्रा. डॉ. अनंत शिरसाट, प्रा. गोविंद गायकी, बारोमासकार सदानंद देशमुख, जि. प. सदस्य जयश्री शेळके, करवंडचे सरपंच जगन्नाथ देशमुख, संमेलनाचे कार्यवाह गणेश निकम यांच्यासह संमेलन आयोजन समितीचे पदाधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, की कोणतेही भाषा शुद्ध-अशुद्ध नसते, तर प्रत्येक बोलीभाषा ही पवित्र असून, महाराष्ट्रातील बहुजन जे बोलीभाषा बोलतात तीच खरी मराठी भाषा आहे. परंतु बोलीला अद्याप भाषा म्हणून मान्यता मिळालेली नाही. मराठी भाषा जगवायची असेल, तर समाजाने आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. शहरात बसून मराठीच्या नावाने गळा काढणारे दुटप्पी आहेत. भाषिक प्रदूषण शहरात असून, मराठी भाषा ग्रामीण भागातच जिवंत ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. अनंत शिरसाठ यांनी, तर संचालन चंद्रशेखर जोशी यांनी आणि स्वागत समारंभ व प्रकाशन सोहळ्याचे संचालन संमेलनाचे संयोजक नरेंद्र लांजेवार यांनी केले. आभार पंजाबराव गायकवाड यांनी मानले. या मराठी संमेलनासाठी जिल्हाभरातून साहित्यिक, लेखक, कवी पंचक्रोशीतील गावकरी, पत्रकार तथा हजारो रसिकांची उपस्थिती होती.मराठी भाषेचे 'बजेट' चौकाचौकांत जाळायला हवे! मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकारने १७ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. यातील सात-आठ कोटी राज्यात फिरण्यासाठीच खर्च होतात. उर्वरित रकमेत मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन कसे करणार? राज्य सरकार मराठी भाषेची थट्टा करत असल्याचा आरोप करत डॉ. जोशी यांनी केला असून, हे बजेट चौकाचौकांत जाळले पाहिजे अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. साहित्य संमेलन न म्हणता मराठी संमेलन म्हणा!आजची संमेलनं साहित्यकेंद्री झाली आहेत. या संमेलनातून भाषा, बोली, संस्कृती बाजूला पडते. त्यामुळे या संमेलनाचं समाजशीलतेशी, मराठी भाषेच्या संस्कृतीशी नातं तुटलं आहे. परिणामी लोक संमेलनांकडे पाठ फिरवतात. त्यामुळे संमेलने व्यापक करण्यासाठी करवंड येथील संमेलनाला साहित्य संमेलन न म्हणता जिल्हा मराठी संमेलन म्हटले असल्याचा खुलासाही जोशी यांनी केला. मराठी भाषेपुढे सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी भाषक अस्मितेचा उद्रेक दाखवल्याशिवाय मराठीच्या संवर्धनासाठी पावले उचलली जाणार नाहीत, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.