गिरिराज सिंह यांच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

By Admin | Updated: April 4, 2015 02:06 IST2015-04-04T02:06:07+5:302015-04-04T02:06:07+5:30

मातोळा येथे गिरिराज सिंह यांच्या पुतळय़ाचे प्रतीकात्मक दहन.

Congress' protest in protest against Giriraj Singh | गिरिराज सिंह यांच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

गिरिराज सिंह यांच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

मोताळा : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी वर्णद्वेषी मुक्ताफळे उधळणार्‍या केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांचा निषेध करून बडतर्फीची मागणी करीत युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटीसह पदाधिकार्‍यांनी ३ एप्रिल रोजी मोताळा फाट्यावर तीव्र निदर्शने केली. यावेळी गिरिराज सिंह यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करू पाहणार्‍या संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांना बोराखेडी पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी बुलडाणा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अँड. विजयसिंग मोरे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तुळशीराम नाईक, बुलडाणा लोकसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष ईरफान पठाण, बुलडाणा लोकसभा यू.काँ सरचिटणीस नीलेश जाधव, पं.स. सदस्य मिलिंद जैस्वाल, चेतन पानसर यांनी गिरिराज सिंह यांच्या महिलाविरोधी वक्तव्याची निंदा केली. याप्रसंगी मिलिंद अहिरे, शे. जमीर, उमेश लाजगे, शंकर तेलंग, अनिल दाभाडे, काशीराम बाजोडे हजर होते.

Web Title: Congress' protest in protest against Giriraj Singh